शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बस ड्रायव्हर कंडक्टरच्या मुलीच्या पडला प्रेमात, फारच इंटरेस्टींग आहे लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 13:17 IST

Love Story : एक बस ड्रायव्हर ज्या मार्गाने बस चालवत होता त्याच मार्गाने बस कंडक्टरचं घर होतं. जिथे तो कधी कधी जेवण करण्यासाठी थांबत होता.

Love Story : बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एक सरकारी बस ड्रायव्हर त्याच बसच्या कंन्डक्टरच्या मुलीच्या प्रेमात पडला आणि दोघेही घरातून फरार झाले. यानंतर एखाद्या सिनेमाच्या कथेसारखं त्यांचं लग्न झालं. या घटनेची कहाणी फारच इंटरेस्टींग आहे.

झालं असं की, एक बस ड्रायव्हर ज्या मार्गाने बस चालवत होता त्याच मार्गाने बस कंडक्टरचं घर होतं. जिथे तो कधी कधी जेवण करण्यासाठी थांबत होता. यादरम्यान त्याची भेट बसच्या कंडक्टरच्या मुलीसोबत झाली. यादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

अनेक महिने हा सिलसिला सुरू होता. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि घरातून फरार झाले. मुलगी घरातून पळून गेल्यावर कंडक्टर वडील पोलिसांकडे गेला आणि ड्रायव्हर विरोधात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या आधारावर तरूण आणि तरूणीला ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला नेलं. तिथे दोघांनीही ते वयस्क असल्याचा दावा केला. पोलिसांनी याची चौकशी केली तर ते सत्य निघालं. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या परिवारांना बोलवलं आणि समजावून सांगितलं.

दोघेही वयस्क असल्याने दोघांचेही परिवार लग्नासाठी तयार झाले आणि त्यांनी लग्न लावून दिलं. त्यानंतर लगेच बाजारातून लग्नाचं साहित्य आणलं आणि तरूणाने तरूणीच्या भांगेत कुंकू भरलं. पोलीस स्टेशनच्या आवारातील मंदिरात त्यांचं लग्न लागलं.

लग्नानंतर तरूण म्हणाला की, तो सरकारी बस चालवतो आणि तीन-चार महिन्यांपासून बस कंडक्टरच्या मुलीच्या प्रेमात पडला. आम्ही आमच्या मर्जीने लग्न केलं. आम्ही लग्न रजिस्टर्डही केलं आहे. दोघेही आनंदी आहेत.

तेच लग्नाबाबत तरूणाची आई म्हणाली की, माझा मुलगा बस चालवतो आणि मुलीचा वडील बस कंडक्टर आहे. मुलगा त्याच्या घरी जेवण करायला जात होता. यादरम्यान दोघे प्रेमात पडले. दोघांनी लग्न केलं. आम्हाला याचा आनंद आहे.

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटकेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट