शहरं
Join us  
Trending Stories
1
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
3
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
4
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
5
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
6
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
7
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
8
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
9
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
10
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
11
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
12
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
13
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
14
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
15
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
16
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
17
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
18
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
19
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
20
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

आदिवासी तरूणावर जडलं फिरायला गेलेल्या विवाहित महिलेचं मन; पतीला सोडलं, आता होतोय पश्चाताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 14:49 IST

ही महिला काही वर्षांआधी केनियामध्ये फिरायला गेली होती. इथे ती एका आदिवासी तरूणाच्या प्रेमात पडली. महिला त्याच्यामागे इतकी वेडी झाली की, तिनं पतीला सोडलं आणि ३ लेकरांना दूर केलं.

जीवन जगत असताना काही लोक कळत-नकळत असं वळण घेतात, ज्याचा त्यांना पुढे जाऊन पश्चाताप होतो. लग्न असो वा प्रेमाबाबत अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात आणि मग चुकीची जाणीव होते. ब्रिटनमधील एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. पती आणि लेकरांना सोडून तिनं असा काही निर्णय घेतला की, तिला आता पश्चाताप होत आहे. ही महिला काही वर्षांआधी केनियामध्ये फिरायला गेली होती. इथे ती एका आदिवासी तरूणाच्या प्रेमात पडली. महिला त्याच्यामागे इतकी वेडी झाली की, तिनं पतीला सोडलं आणि ३ लेकरांना दूर केलं. त्यानंतर आदिवासी तरूणासोबत लग्न केलं. पण नंतर असं काही घडलं की, दोघांचं नातं तुटलं आणि लग्नाच्या साधारण ३० वर्षानंतर महिलेला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला.  

मिरर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, साल १९९४ मध्ये ब्रिटनमधील शेरिल थॉमसगुड (Cheryl Thomasgood) ३४ वर्षांची असताना, केनियामध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. इथे ती मसाई या आदिवासी जमातीतील तरूण डॅनिअल लेकिमेन्चो (Daniel Lekimencho) याच्या प्रेमात पडली. पण आता शेरिलला तिच्या या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. शेरिलनं तिची कहाणी शेअर करत इतर सुट्टीवर गेल्यावर प्रेमात पडण्याबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 

शेरिल इंग्लंडच्या ऑइल ऑफ व्हाइटमध्ये आरामाचं जीवन जगत होती. त्यावेळी ती बालपणीच्या काही समस्या आणि मोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नात्याचा सामना करत होती. एक दिवस ती चर्चमधील मैत्रिणीच्या सल्ल्यावरून केनियातील मोंबासामधील बांबुरी बीच हॉटेलमध्ये पोहोचली. इथेच तिची भेट पारंपारिक आदिवासी नृत्य करणाऱ्या टीममधील डॅनिअलसोबत झाली.

आदिवासी तरूणावर जडलं प्रेम आणि...

डॅनिअलचा साधेपणा आणि भौतिक गोष्टींमध्ये नसलेला इंटरेस्ट पाहून शेरिल त्याच्याकडे आकर्षित झाली. ती डॅनिअल प्रेमात इतकी अडकली होती की, तीन आठवड्यांनी यूकेला परत येऊन तिनं पती आणि तीन लेकरांना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेरिल पुन्हा केनियाला परत गेली आणि डॅनिअलसोबतच त्याच्या जमातीतील लोकांसोबत राहू लागली. ती बकरीच्या चामड्यावर झोपत होती, आगीवर जेवण शिजवत होती. कोबी आणि गायीचं रक्त अशा पारंपारिक गोष्टीही खात होती. १९९५ मध्ये शेरिल आणि डॅनिअल इंग्लंडला परतले आणि व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी मसाई समाजाचे पारंपारिक कपडे घालून लग्न केलं.

मग डॅनिअल शेरिलच्या लेकरांसोबत आइल ऑफ व्हाइटमध्ये राहू लागला. त्यांच्या एका मुलीचा मिस्टीचा जन्म झाला. आता ती २७ वर्षांची आहे. सुरूवातीची काही वर्ष तर सगळं काही ठीक सुरू होतं. पण लवकरच शेरिलला जाणीव झाली की, डॅनिअल आता आध्यात्मिक राहिलेला नाही. तो आता धन आणि भौतिक सुखाच्या मागे धावू लागला होता. मोठ घर, महागडे कपडे आणि आपल्या परिवाराला पैसे पाठवण्याचा हट्ट करू लागला.

पतीपासून घेतला घटस्फोट

शेरिल सांगते की, "मला वाटू लागलं की, मी केवळ एक खाऊ घालणारी व्यक्ती राहिली आहे. मला खूप पश्चाताप आहे. खासकरून मुलांवर पडलेल्या प्रभावाबाबत". डॅनिअलच्या बदललेल्या सवयी तिला खटकत होत्या. वाद इतके वाढले की, नंतर १९९९ मध्ये त्यांचा संसार मोडला आणि त्यांनी घटस्फोट घेतला. 

शेरिल सांगते की, तिनं नातं केवळ यासाठी निभावलं कारण तिला समाजाला चुकीचं सिद्ध करायचं होतं. "सगळ्यात मोठा पश्चाताप हा आहे की, माझी मुलं डॅनिअलला एक स्थिर पिता म्हणून स्वीकारू शकले नाहीत. त्यांनी खूपकाही गमावलं आहे".  आता शेरिल म्हणते की, ती आता पुन्हा लग्न करणार नाही. ती तिची चार मुलं स्टीव, टॉमी, क्लो आणि मिस्टीसोबत शांततेत जीवन जगत आहे. डॅनिअल सध्या आइल ऑफ व्हाइटमध्येच राहतो आणि एका सुपरमार्केटमध्ये काम करतो.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके