शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या 3 दिवसाआधी नवरीने दिला बाळाला जन्म, म्हणाली - 'माहीत नव्हतं ती प्रेग्नेंट आहे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 12:24 IST

४० वर्षीय लिसाने आपली कहाणी टीएलसीच्या यूट्यूब पेजवर शेअर केली आहे आणि वेदनादायी घटनांची माहिती दिली आहे.

ब्रिटनमधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे लग्नाच्या तीन दिवसाआधी नवरीने एका बाळाला जन्म दिला. ज्याबाबत समल्यावर सगळेच हैराण झाले. आता महिलेने तिच्यासोबत घडलेली घटना सर्वांसोबत शेअर केली आहे. आणि तिने सांगितलं की, तिला या गोष्टींचा अजिबात अंदाज नव्हता की, ती गर्भवती आहे.

४० वर्षीय लिसाने आपली कहाणी टीएलसीच्या यूट्यूब पेजवर शेअर केली आहे आणि वेदनादायी घटनांची माहिती दिली आहे. तिने सांगितलं की, 'मी विचार केला होता की, आई होण्यासाठी आता मी फार म्हातारी झाली आहे. पण लग्नाच्या तीन दिवसाआधी अचानक मला वेदना सुरू झाल्या आणि मला लगेच इमरजन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मी एका बाळाला जन्म दिला. जेव्हा मी बाथरूमला गेली आणि तेव्हा लक्षात आलं की, काहीतरी वेगळं आहे. कारण रक्त वाहत होतं'. (हे पण वाचा : अरे बाप रे बाप! २५ वेगवेगळ्या पुरूषांसोबत पळून गेली होती महिला, मग पती म्हणाला असं काही...)

'द सन'च्या रिपोर्टनुसार, प्रेग्नेन्सीमध्ये सामान्यपणे वजन वाढतं. पण लिसाने सांगितलं की, तिचं वजन वाढण्याऐवजी कमी झालं होतं. त्यासोबतच तिने व्हिडीओत सांगितलं की, तिला प्रेग्नेन्सीसंबंधी कोणतेही सामान्य लक्षण दिसत नव्हते. जसे की, मळमळ होणे किंवा स्तनांमध्ये वेदना होणे'.

प्रेग्नेन्सीचा टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह

लिसाने सांगितलं की, 'दोन महिने पाळी न आल्याने मी प्रेग्नेन्सी टेस्ट केली. ज्याचा रिझल्ट निगेटिव्ह आला. त्यामुळे मला वाटलं की, ही मेनोपॉजची सुरूवात आहे. चार महिने होऊनही पाळी न आल्याने मी पुन्हा एक प्रेग्नेन्सी टेस्ट केली. पण त्यावेळीही काही रिपोर्ट आला नाही आणि यावेळी रिपोर्ट निगेटिव्ह आला'.

होणारा पतीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला

लिसाने सांगितलं की, 'मी माझा जोडीदार जेसनसोबत लग्न करणार होते. त्याच्या सोबत एका रेस्टॉरन्टमध्ये काम करण्या दरम्यान भेट झाली होती. लग्नाच्या तीन दिवसाआधी मी रक्ताने माखली होती. त्यानंतर जेसन मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. इथे डॉक्टरांनी सांगितलं की, तिचा गर्भपात झाला आहे. जेव्हा लिसाने सांगितलं की, ती गर्भवती नाहीये. तर डॉक्टरांनी टेस्ट केली'.

७ महिन्यांची होती गर्भवती

डॉक्टरांनी टेस्ट केल्यावर सांगितलं की, ती साधारण  २८ ते ३० आठवडे म्हणजे साधारण ७ महिन्यांची प्रेग्नेंट आहे. त्यासोबतच डॉक्टरांनी सांगितलं की, लिसाला प्लेसेंटा तुटल्याने जास्त ब्लीडिंग होत आहे. असं तेव्हा होतं जेव्हा प्लेसेंटा वेळेआधी गर्भाशयापासून वेगळा होतो.

ऑपरेशनवेळी बाळाचा जन्म

प्लेसेंटा तुटण्याचा अर्थ असा की, बाळाला आईकडून होणारा रक्त पुरवठा बंद होणार होता. त्यामुळे डॉक्टरांनी इमरजन्सीमध्ये लिसाचं ऑपरेशन केलं आणि प्रीमेच्योर बाळाला बाहेर काढलं. जन्मावेळी बाळाचं वजन १.९२ किलो ग्रॅम इतकं होतं. 

टॅग्स :LondonलंडनJara hatkeजरा हटकेPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला