शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

प्रिन्स चार्ल्स आणि राजकुमारी डायनाच्या लग्नातील केकच्या तुकड्याचा लिलाव, किंमत वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 17:44 IST

केकचा हा तुकडा लग्नाच्या २३ अधिकृत केकपैकी एका केकचा आहे. जो ब्रिटिश शाही कपलने आपल्या लग्नात कापला होता.

राजकुमार चार्ल्स आणि दिवंगत राजकुमारी डायना यांच्या लग्नातील केकचा एक तुकडा १,८५० पाउंडमध्ये लिलावात विकला गेला. भारतीय करन्सीनुसार ही किंमत १,९०,५८५ रूपये इतकी होते. काल्पनिक कथांमध्ये ऐकतो तशा झालेल्या या ४० वर्षापूर्वीच्या लग्नातील केकचा तुकडा आता इतक्या किंमतीला विकला जाणं फारच आश्चर्यकारक आहे. केकचा हा तुकडा लग्नाच्या २३ अधिकृत केकपैकी एका केकचा आहे. जो ब्रिटिश शाही कपलने आपल्या लग्नात कापला होता.

केकची आयसिंग आणि बदामच्या मिठाईपासून तयार बेसमध्ये शाही 'कोट ऑफ आर्म्स' ला विशेष डिझाइनमध्ये दाखवण्यात आलं आहे. हा तुकडा क्लीन मदरच्या स्टाफमधील एक सदस्य मोया स्मिथला दिला गेला होता. ज्याला एका प्लास्टिकमध्ये बांधून तिने संरक्षित केला होता आणि त्यावर २९ जुलै १९८१ तारीखही लिहिली होती. (हे पण वाचा : बाबो! ४७ वर्षीय शिक्षकाच्या प्रेमात पडली १९ वर्षीय तरूणी, आता रोमान्ससाठी शिक्षण सोडायलाही तयार)

बीसीसीच्या वृत्तानुसार, स्मिथने केकचा हा तुकडा एका जुन्या केक टिनमध्ये ठेवला होता आणि त्याच्या झाकणावर हाताने लिहिलेलं एक लेबल लावलं होतं. ज्यात लिहिलं होतं की, 'काळजीपूर्वक स्पर्श करा, राजकुमार चार्ल्स आणि राजकुमारी डायनाच्या लग्नाचा केक'. स्मिथच्या परिवाराने हा केक २००८ मध्ये एका संग्राहकला विकला होता.

या केकच्या लिलावात जगभरातील लोकांनी सहभाग घेतला होता आणि केकचा तुकडा बुधवारी गेली लेयटन यांना विकण्यात आला. केकच्या या तुकड्याला केवळ ५०० पाउंड मिळतील अशी अपेक्षा होती. पण लिलावकर्ते म्हणाले की, ते मिळालेल्या किंमतीने हैराण झाले आहे. 

टॅग्स :LondonलंडनInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके