शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आधी डाएटिंग करा अन् मगच लग्नात या, नवरीबाईच्या विचित्र अटी ऐकुन मैत्रीणी लग्नातून पळाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 18:44 IST

एक नवरीबाई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली आहे. तिनं आपल्या लग्नासाठी अतिशय विचित्र अटी ठेवल्या. या अटी ऐकून सगळ्यात आधी तर नवरीच्या मैत्रिणींनीच या लग्नातून काढता पाय घेतला.

लग्नाबाबत (Wedding Party) प्रत्येक व्यक्तीची वेगळी स्वप्न असतात. हे लग्न अधिक खास बनवण्यासाठी वेगवेगळे प्लॅनिंग (Wedding Plan) केले जातात. नुकतंच एक नवरीबाई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली आहे. तिनं आपल्या लग्नासाठी अतिशय विचित्र अटी ठेवल्या. या अटी ऐकून सगळ्यात आधी तर नवरीच्या मैत्रिणींनीच या लग्नातून काढता पाय घेतला.

ज्या नवरीबद्दल आम्ही सांगत आहोत तिनं स्वतःची लग्न अगदी सुंदर पद्धतीनं ऑर्गनाईज केलं. मात्र, ज्यांना तिनं आपल्या लग्नात बोलावलं त्यांना स्वतःचा जवळपास सर्व खर्च स्वतःच करायला लावला. विशेषतः नवरीच्या मैत्रिणींचा परदेशात राहण्याचा खर्च आणि त्यांच्या मेकअपचा खर्च करण्यास नवरीनं नकार दिला.. तिच्या अटी ऐकून जवळपास सर्व मैत्रिणींनी या लग्नात जाण्यासच नकार दिला.

नवरीनं आपल्या लग्नासाठी सुंदर रिसॉर्ट बुक केलं. इथे नवरीबाई, तिचे घरचे लोक आणि नवरदेवाच्या घरच्यांसाठी रूम बुक केल्या गेल्या. मात्र, लग्नात येणाऱ्या नवरीच्या मैत्रिणींना सांगण्यात आलं की तुम्ही स्वतःच तुमच्या पैशांनी इथे राहण्याची व्यवस्था करा. इतकंच नाही तर त्यांना लग्नात घालायचे ब्राइड्समेड्स ड्रेसेसही स्वतःच खरेदी करण्यास सांगण्यात आले. सोबतच आपल्या हेअरस्टायलिंग आणि मेकअपची व्यवस्थाही स्वतःच करण्याचा सल्ला दिला गेला. विचित्र बाब म्हणजे लग्नाच्या एक दिवस आधीपासूनच त्यांना डायटिंगचा सल्ला देण्यात आला.

Daily Star च्या वृत्तानुसार, नवरीचं म्हणणं आहे की हळूहळू तिच्या सर्वच मैत्रिणींनी लग्नात येण्यास नकार दिला. मी त्यांना स्वतःचा खर्च स्वतः करण्याचा सल्ला दिला, तर यात चुकीचं काय आहे? असा सवाल तिने केला. नवरीची ही पोस्ट पाहून रेडिट यूजर्सने तिला भरपूर सुनावलं. आपल्या आनंदासाठी तू इतरांना त्रास देत असल्याचं अनेकांनी नवरीला म्हटलं.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके