शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

दुकानादाराने केलेल्या 'त्या' कृत्याची नवरीला आला संताप, म्हणून तिने दुकानातले कपडेच फाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 18:13 IST

भडकलेली नवरी (Angry Bride) काय करेल, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. असंच एक प्रकरण चीनच्या चोंगकिंग शहरात पाहायला मिळालं.

लग्नाच्या वेळीच अचानक समजलं की नवरीसाठी तयार केला जाणारा ड्रेस कॅन्सल केला गेला आहे आणि दुकानदार अ‍ॅडवान्स परत द्यायलाही तयार नाही, तर एखाद्या नवरीची काय अवस्था होईल? नवरीच्या रागाचा आपण अंदाज लावूही शकतो. मात्र यानंतर भडकलेली नवरी (Angry Bride) काय करेल, याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. असंच एक प्रकरण चीनच्या चोंगकिंग शहरात पाहायला मिळालं.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की एका भडकलेल्या नवरीने दुकानात जात एक-एक करून अनेक लग्नाचे कपडे फाडले (Bride Cut Up Many Wedding Dress at Bridal Salon). ही घटना तेव्हा घडली, जेव्हा स्टोअरने एक ऑर्डर अचानक कॅन्सल केली आणि यासाठी देण्यात आलेला अ‍ॅडवान्स परत देण्यासही नकार दिला.

महिलेचं नाव जियांग असं असल्याचं समोर आलं आहे आणि ती दक्षिण-पश्चिम शहर चोंगकिंगमधील एका ब्रायडल सलूनमध्ये जाऊन कात्रीने कपडे फाडताना व्हिडिओमध्ये कैद झाली आहे. घटना ९ जानेवारीची आहे. डेली मेलने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं, की जियांगने ११ हजार डॉलर म्हणजेच ८ लाख १२ हजार ६३ रुपयांचे ३२ लग्नाचे ड्रेस फाडले. महिलेनं १ हजार २५० डॉलर म्हणजेच ९२ हजार ८१३ रुपयांचा एक ड्रेस ऑर्डर केला होता. ही ऑर्डर कॅन्सल झाल्यानंतर तिनं केलेलं ४० हजार ८३७ रुपयांचं अ‍ॅडवान्स पेमेंट परत करण्यास दुकानाने नकार दिल्याने महिलेनं हे कृत्य केलं.

चीनी सोशल मीडिया नेटवर्क वीबो आणि ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये महिला स्टोरमध्ये जाऊन गोंधळ घालताना दिसते. न थांबता ती अनेक कपडे कापत राहाते. व्हिडिओमध्ये कोणाचातरी आवाजही ऐकू येतो, की नीट विचार कर, या ड्रेसेसची किंमत खूप जास्त आहे. यावर होणारी नवरी उत्तर देते, 'हजारो? भलेही ती कितीतरी दहा-हजार असो'. असं म्हणून पुढे ते हे कपडे फाडतच राहाते

टॅग्स :Jara hatkeजरा हटके