शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

इथे लग्नानंतर तीन दिवस बाथरूमला जाऊ शकत नाही नवरी, जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 14:52 IST

Marriage Weird Rituals : आज आम्ही तुम्हाला परदेशातील लग्नाची एक अशी प्रथा सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही कपळावर हात मारून घ्याल.

Marriage Weird Rituals : लग्नाबाबत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे रितीरिवाज असतात. कुठे मुलींना पळवून नेऊन लग्न केलं जातं तर कुठे आणखी काही केलं जातं. भारतातही वेगवेगळ्या भागांमध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही प्रथा तर इतका वेगळ्या असतात की, त्यावर विश्वासही बसत नाही. मात्र, आज आम्ही तुम्हाला परदेशातील लग्नाची एक अशी प्रथा सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही कपळावर हात मारून घ्याल.

नवीन जोडप्यासाठी अनोखा नियम

इंडोनेशियामध्ये लग्नानंतर एक अनोखी प्रथा पाळली जाते. लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्याला टॉयलेटला जाण्यास बंदी असते. हा प्रथा इंडोनेशियातील टीडॉन्ग समुदायातील लोक पाळतात. या समुदायातील लोक या प्रथेला फार महत्वपूर्ण समजतात. या रिवाजानुसार नवीन जोडपं तीन दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाही. असं करणं अपशकुन मानला जातो. 

काय आहे मान्यता?

स्थानिक लोकांनुसार लग्न ही एक पवित्र प्रथा आहे आणि अशात ते लोक टॉयलेटला गेल्यास त्यांची पवित्रता भंग पावते. सोबतच नववधू वर याने अशुद्ध होतात. 

आणखी एक कारण...

इंडोनेशियामध्ये ही प्रथा पाळण्याचं आणखी एक कारण म्हणजे नववधू आणि वराला नजर लागू नये हेही आहे. त्यांची मान्यता आहे की, टॉयलेटचा वापर अनेक लोक करतात. ते त्यांच्या शरीरातील घाण काढतात. त्यामुळे टॉयलेटमध्ये नकारात्मक शक्ती असते. लग्न झाल्यानंतर लगेच टॉयलेटला गेल्यास ती नकारात्मकता नव्या जोडप्यामध्येही प्रवेश करते. 

या लोकांची अशीही एक धारणा आहे की, लग्नानंतर लगेच टॉयलेटचा वापर केल्यास नवीन जोडप्याचं नातंही धोक्यात येतं. कधी कधी नातं तुटतं. दोघांनाही टॉयलेटला जावं लागू नये म्हणून दोघांनाही खाण्यासाठी कमी दिलं जातं. समुदायातील सर्व लोक हा रिवाज काटेकोरपणे पाळतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके