शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिल्या रात्रीच हॉस्पिटलमध्ये पोहोचली नवरी, अतिउत्साहात सरकलं खांद्याचं हाड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:27 IST

मिररच्या रिपोर्टनुसार, नवरीचं नाव एवलिन मॅककूल आहे. तिचं लग्न पीटर मॅककॅपिन नावाच्या तरूणासोबत होत होतं. लग्नाच्या दिवशी एक डान्स कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं होतं.

कोणत्याही नवरी-नवरदेवासाठी त्यांच्या लग्नाचा दिवस त्यांच्यासाठी आयुष्यातील सर्वात खास असतो. हा दिवस यादगार बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जातात. कुणी खास पद्धतीने एन्ट्री घेतलं तर कुणी डान्स परफॉर्मन्स करतं. हे बघून पाहुण्यांनाही आनंद होतो. असंच काहीसं ब्रिटनमधील एका नवरीसोबत झालं. ती तिच्या लग्नादरम्यान डान्स करत असताना जखमी झाली आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.  

मिररच्या रिपोर्टनुसार, नवरीचं नाव एवलिन मॅककूल आहे. तिचं लग्न पीटर मॅककॅपिन नावाच्या तरूणासोबत होत होतं. लग्नाच्या दिवशी एक डान्स कॉम्पिटिशन ठेवण्यात आलं होतं. ज्यात एवलिन आपल्या नवरदेवाला इम्प्रेस करण्यासाठी डान्स परफॉर्मन्स करत होती. या दरम्यान तिच्यासोबत एक वाईट घटना घडली आणि वेडिंग ड्रेसमध्येच तिला स्ट्रेचरच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

लग्नादरम्यान नवरी-नवरदेवाच्या डान्सची घोषणा झाली. एवलिन डान्स फ्लोरवर आली. ती हसत-अदा दाखवत जोशमध्ये डान्स करत होती. यावेळी तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली. खाली पडत असताना तिने डाव्या हाताने स्वत:ला जमिनीवर पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण अशातच तिच्या खांद्याचं हाड सरकलं. ती वेदनेने ओरडत होती. तर लगेच लोकांनी तिला स्ट्रेचरच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये नेलं. इथे रात्रीभर तिच्यावर उपचार केले गेले आणि दुसऱ्या दिवशी तिला सुट्टी देण्यात आली.

आयटी कंपनीत काम कऱणाऱ्या एवलिनने स्वत: या घटनेबाबत मिररला सांगितलं. ती म्हणाली की, 'तिचा पती एक चांगला डान्सर  आहे आणि लग्नातील डान्स कॉम्पिटिशनमध्ये मला त्याला मागे सोडायचं होतं. त्याच जोशात मी डान्स करत होते. तेव्हाच ही घटना घडली'. लग्नाच्या दिवशीच ही घटना झाल्याने लग्नाची पहिली रात्र घरी राहण्याऐवजी तिला हॉस्पिटलमध्ये काढावी लागली. दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLondonलंडन