शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

गर्लफ्रेंडच्या घरी गेला तरुण; तिची आई निघाली 'एक्स' अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 11:04 IST

Boyfriend Meets Girlfriend’s Parents : गर्लफ्रेंड आपल्या प्रियकराला घेऊन घरी गेली आणि त्याची आपल्या पालकांशी ओळख करून दिली. यावेळी प्रियकराने प्रेयसीच्या आईला पाहताच, सर्वच जण अवाक झाले.

आपण ऐकले असेल की, गर्लफ्रेंड अनेकवेळा आपल्या बॉयफ्रेंडला पालकांच्या भेटीसाठी घेऊन जातात. मात्र, आज आम्ही आपल्याला अशाच एका घटनेसंदर्भात सांगणार आहोत. ज्यात, असे करणे गर्लफ्रेंड, तिचा प्रियकर आणि तिची आई या तिघांनाही जबरदस्त महागात पडले. ही भेट प्रियकरासाठी पश्चातापाचे कारण ठरली. (Affair with Girlfriend Mother)

द सन वेबसाइटच्या एका वृत्तानुसार, गर्लफ्रेंड आपल्या प्रियकराला घेऊन घरी गेली आणि त्याची आपल्या पालकांशी ओळख करून दिली (Boyfriend Meets Girlfriend’s Parents). यावेळी प्रियकराने प्रेयसीच्या आईला पाहताच, सर्वच जण अवाक झाले. संबंधित व्यक्तीने या घटनेसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर (Viral Reddit Post) एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे.

प्रेयसीच्या घरी जाणे पडले महागात -प्रियकराने म्हटले आहे की, अनेक दिवसांपासून त्याच्या मैत्रिणीला, त्याला तिच्या घरी नेण्याची इच्छा होती. प्रेयसी तिच्या पालकांची आणि त्याची ओळख करून देण्यासाठी अत्यंत उत्सूक होती. ती त्याला रोज घरी येण्याचा आग्रह करत होती. यानंतर एक दिवस तो आपल्या मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी तयार झाला. त्याने सांगितले की, तो नुकताच त्याच्या प्रेयसीच्या घरी गेला होता आणि तिच्या पालकांना भेटला. पण तो तिच्या आईला पाहून थक्क झाला.

प्रियकराने सांगितले की, त्याचे दोन वर्षांपूर्वी प्रेयसीच्या आईसोबत अफेअर होते. त्याच्या म्हणण्यानुसार, तो 19 वर्षांचा असताना पर्सनल ट्रेनर म्हणून काम करत असे. त्याच काळात त्याच्या प्रेयसीची आई जिममध्ये यायची. येथे दोघींची भेट झाली आणि नंतर ते फिजिकल रिलेशनमध्ये आले. एवढेच नाही, तर दोघांचे नाते खूप मधुर होते, असेही त्याने म्हटले आहे.

तरुणाला यामुळे होतोय पश्चाताप... - तरूनाणे सांगितले की, त्याच्या मैत्रिणीची आई तेव्हा 40 वर्षांची होती, पण ती अगदी 25 वर्षांच्या मुलीसारखीच दिसत होती. यामुळेच तो तिच्याकडे आकर्षित झाला होता. तसेच, प्रेयसीची आई त्याची एक्स गर्लफ्रेंड होती याचे त्याला दु:ख नाही. तर, ती आपल्या मैत्रिणीची आई असल्याची खंत आहे, असेही त्याने म्हटले आहे.

तरुणाने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तो त्याच्या सध्याच्या गर्लफ्रेंडला ओळखत नव्हता. तसेच त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फसवणूकही केली नाही. मात्र, तिच्या आईला भेटल्याचा पश्चाताप होत आहे. तसेच, आपण आपल्या गर्लफ्रेंडलाही हे सांगू शकत नाही आणि त्यावेळी स्वत: एक्स गर्लफ्रेंडनेच दोघांमधील वयात खूप अंतर आहे, असे सांगून नाते तोडले होते, असेही त्याने म्हटले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय