शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंड झोपताच महिलांना करायचा असे मेसेजेस की सांगताना तरुणीला वाटू लागली लाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:58 IST

या महिलेला आपला प्रियकर धोका (Cheater Boyfriend) देत असल्याचं समजताच तिने ब्रेकअप (Breakup) केलं. प्रेयसीच्या नकळत हा व्यक्ती ८५ महिलांना मेसेज करून त्यांच्यासोबत फ्लर्ट करत असे. ब्रेकअपनंतर महिलेनं त्या मेसेजबद्दलही लोकांना सांगितलं, जो मेसेज तिचा प्रियकर सर्व महिलांना पाठवत असे.

सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू आहे. या आठवड्यात लोक आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्याच्याजवळ ते व्यक्त करतात आणि नातं अधिक खास बनवण्याचा प्रयत्न करतात. लोक प्रेम आणि विश्वासाच्या आधारे हे नातं बनवतात. मात्र, सोशल मीडियावर एका महिलेनं अतिशय दुःखी मनाने आपल्या प्रियकराचं खरं रूप लोकांसमोर आणलं.

या महिलेला आपला प्रियकर धोका (Cheater Boyfriend) देत असल्याचं समजताच तिने ब्रेकअप (Breakup) केलं. प्रेयसीच्या नकळत हा व्यक्ती ८५ महिलांना मेसेज करून त्यांच्यासोबत फ्लर्ट करत असे. ब्रेकअपनंतर महिलेनं त्या मेसेजबद्दलही लोकांना सांगितलं, जो मेसेज तिचा प्रियकर सर्व महिलांना पाठवत असे.

सोशल मीडियावर टोरी नावाच्या महिलेनं आपल्या प्रियकराने दिलेल्या धोक्याची कथा शेअर केली आहे. टोरीला आपल्या प्रियकराच्या फोनमध्ये डेटिंग अ‍ॅप दिसलं. जेव्हा हे अ‍ॅप तिने उघडलं, तेव्हा ती समजलं की तिचा प्रियकर नवनवीन महिलांसोबत बोलण्यात अतिशय उत्सुक होता. त्याने तब्बल ८५ महिलांना मेसेज केला होता. मात्र, हैराण करणारी बाब म्हणजे यातील कोणीच या व्यक्तीला भाव दिला नव्हता. (Man Flirting With 85 Women)

टोरीने आपल्या प्रियकराने दिलेल्या या धोक्याबद्दल एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. व्हिडिओ आतापर्यंत 9 लाखहून अधिकांनी पाहिला आहे. टोरीने सांगितलं की पार्टनरच्या फोनमधून त्याने केलेल्या विश्वासघाताचा खुलासा होण्यापेक्षा वाईट काय असेल. जेव्हा मी माझ्या प्रियकराचा फोन बघितला तेव्हा समजलं की त्यानं ८५ महिलांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यापेक्षाही लाजिरवाणी गोष्ट म्हणजे, यातील कोणालाच त्याच्यासोबत बोलायची इच्छा नव्हती. टोरीने म्हटलं की जेव्हा मला समजलं की तो मला धोका देण्यासाठी किती उतावळा आहे, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. यानंतर तिने स्वतःच त्याच्यासोबत ब्रेकअप केलं.

टोरीने पुढे सांगितलं की तिचा एक्स सर्व महिलांना केवळ 'हाय' एवढाच मेसेज करत होता. मात्र कोणीही त्याला भाव दिला नाही. आता टोरीने या व्यक्तीसोबतचं आपलं नातं तोडलं आहे आणि ती आपल्या आयुष्यात पुढे गेली आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके