शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

फक्त पोटभर जेवली, म्हणून बॉयफ्रेंडने उचलंल असं पाऊल की सर्वजण झाले शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 19:17 IST

आपल्या जोडीदाराला काय खायला आवडतं, कसं खायला आवडतं, काय खाल्ल्यावर त्याला त्रास होतो, त्याला काय खायला आवडत नाही याची पुरेपूर माहिती त्यांना एकमेकांना असते आणि त्याचप्रकारे त्याची काळजी घेतली जाते. पण एका बॉयफ्रेंडने तर हद्दच केली. पार्टीमध्ये गर्लफ्रेंडने पोटभर खाल्लं म्हणून असं काही केलं जे समजताच सर्वजण हैराण झाले आहेत.

नवरा-बायको असो किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड (Girlfriend boyfriend) या नात्यात वाद हे होतच असतात. जितकं प्रेम असतं तितकीच भांडणंही होतात. पण तरी ते एकमेकांची काळजी घेतात. विशेषतः खाण्याबाबत. आपल्या जोडीदाराला काय खायला आवडतं, कसं खायला आवडतं, काय खाल्ल्यावर त्याला त्रास होतो, त्याला काय खायला आवडत नाही याची पुरेपूर माहिती त्यांना एकमेकांना असते आणि त्याचप्रकारे त्याची काळजी घेतली जाते. पण एका बॉयफ्रेंडने तर हद्दच केली. पार्टीमध्ये गर्लफ्रेंडने पोटभर खाल्लं म्हणून असं काही केलं जे समजताच सर्वजण हैराण झाले आहेत.

तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत डिनर पार्टीवर (Dinner Party Manners) गेली होती. तिथं तिने मनसोक्त पोटभर खाल्लं आणि दोघंही परतत असताना तिच्या बॉयफ्रेंडने तिला असं काही सांगितलं, ज्याचा तिने विचारही केला नसेल. या तरुणीने आपली विचित्र व्यथा सोशल मीडियावर मांडली आहे. (Girlfriend boyfriend dispute over eating)

तरुणीने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं, गेल्या सात महिन्यांपासून ज्या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, त्याने आपल्या घरी फॅमिली डिनरसाठी बोलावलं. जेव्हा ती त्याच्या घरी जेवायला गेली तेव्हा तिने सर्व पदार्थांची चव चाखली आणि भरपेट खाल्लं. त्यावेळी तिच्या बॉयफ्रेंडने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला. जसे दोघंही डिनर पार्टीहून परतले तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने तिला खाण्यावरून खूप सुनावलं. तुला खाण्याचे मॅनर्स नाहीत. डिनर पार्टीत तिने इतकं खाल्लं की मला लाज वाटू लागली, असं तो तिला म्हणाला.

आपल्या बॉयफ्रेंडचं असं म्हणणं ऐकून तिलाही आश्चर्य वाटलं. तिने आपल्या या सवयीबाबत त्याच्यासमोर स्पष्टीकरण दिलं.  कुणाच्याही घरी गेल्यानंतर ताटातील संपूर्ण अन्न संपवावं, जेणेकरून समोरच्याला वाईट वाटणार नाही असं तिला नेहमी सांगण्यात आल्याचं ती म्हणाली. पण असं सर्वकाही खाणं म्हणजे चांगलं नाही, दुसऱ्याला लाज वाटेल असं कृत्य आहे, असं तिचा बॉयफ्रेंड म्हणाला. तरुणीने रेडिट साईटवर आपला हा अनुभव मांडला. त्यावेळी बहुतेकांनी तिला अशा मुलाला सोडण्याचाच सल्ला दिला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके