शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडने तिच्या एक्स गर्लफ्रेंड सोबत केले असे काम की गर्लफ्रेंडच्या पायाखालची जमीन सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 13:59 IST

एका तरुणीच्या वाट्याला असा अनुभव आला ज्यामुळे तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिचा बॉयफ्रेंड ज्यावर ती मनापासून प्रेम करत होती त्याने अशी गोष्ट केली होती ज्याची तिने कल्पनाही केली नसेल.

एखाद्या नात्यामध्ये विश्वास महत्त्वाचा असतो. त्याला जर तडा गेला तर होत्याचं नव्हतं होतं. एका तरुणीच्या वाट्याला असा अनुभव आला ज्यामुळे तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिचा बॉयफ्रेंड ज्यावर ती मनापासून प्रेम करत होती त्याने अशी गोष्ट केली होती ज्याची तिने कल्पनाही केली नसेल.

तर झालं असं की, तिचा बॉयफ्रेंड कॉलेजमधील सर्वात हँडसम आणि चार्मिंग तरुण होता. अनेक तरुणींचा तो क्रश होता. त्यामुळे जेव्हा तो तिचा बॉयफ्रेंड झाला तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. सुरुवातीला सर्व छान सुरु होते पण काही दिवसांनी कॉलेजचा फेस्ट आला. त्यात ती इतकी बिझी झाली कि तिला त्याच्याशी बोलायला वेळच नव्हता. ते दोघे फेस्टच्या दरम्यान एकमेकांना क्वचितच भेटत. फेस्ट संपला अन् यशस्वी झाला. त्यानिमित्त सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पार्टी करण्याचे ठरवले. पार्टीच्या दरम्यान सर्व एंजॉय करत असताना त्यांचा मोबाईल वाजला अन् त्यावर एक नोटीफिकेशन आलं होतं. त्या नोटीफिकेशनमध्ये एका मुलीचा प्रायव्हेट व्हिडिओ होता. त्या गर्लफ्रेंडने लगेचच तेथील उपस्थित सर्वांना तो व्हिडिओ डीलीट करायला लावला. तिने लगेच ओळखलेलं की जिचा प्रायव्हेट व्हिडिओ होता ती तरुणी त्याची एक्स गर्लफ्रेंड होती. तीही त्या पार्टीत उपस्थित होती. तिने हा प्रकार पाहताच ती रडत टॉयलेटमध्ये पळाली आणि तिच्या मैत्रीणी तिचं सांत्वन करायला तिच्या मागे धावल्या.

हा प्रकार घडल्यानंतर एकदा गर्लफ्रेंडच्या हातात मोबाईल आला. त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड कुठेतरी बाहेर गेला होता. तो फोन तसाच ठेऊन घेतल्याने तिने तो फोन चेक करायला सुरुवात केली. तिच्या तिच्या बॉयफ्रेंडचे त्याच्या मित्रांसोबतचे चॅट मिळाले अन् त्या मुलीचा व्हिडिओही मिळाला. त्याने त्याच्या मित्रांना प्लॅन यशस्वी झाला म्हणून मेसेज पाठवला होता. त्या तरुणीने त्याचा फोन पूर्ण चेक करुन तिचे प्रायव्हेट व्हिडिओज तर नाहीत ना? याची खात्री करुन घेतली. काहीच दिवसांत तिने त्या तरुणाशी ब्रेकअप केले. या प्रकरणामुळे ती चांगलीच हादरली होती आणि धास्तावली होती.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके