शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सुपरहिरो होण्याच्या नादात मुलाने टोचून घेतलं पाऱ्याचं इंजेक्शन आणि मग झालं असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 12:55 IST

हा मुलगा एक्स-मॅन सुपरहिरो मर्क्युरीने प्रेरित होता आणि त्याला त्याच्यासारखं व्हायचं होतं. दिवसभर त्याच्यासारखाच अभिनय करत राहत होता.

जेव्हापासून टीव्हीवर सुपरहिरोंच्या मालिका किंवा सिनेमे मुलांनी बघणं सुरू केलं तेव्हापासून त्यांच्यात एक वेगळीच क्रेझ बघायला मिळते. मुलांनाही त्या हिरोंसारखं व्हायचं असतं, जे काहीही करू शकतात. आकाशात उडू शकतात, बिल्डींगवर चढू शकतात आणि संकटात असणाऱ्यांना वाचवतात. पण सुपरहिरो बनण्याच्या नादात एका 15 वर्षाच्या मुलाने असं काही केलं जे वाचून तुम्हाला धक्का बसेल. सुपरमॅन बनण्यासाठी त्याने आपल्या शरीरात मर्क्युरीचं म्हणजे पाऱ्याचं इंजेक्शन टोचून घेतलं. मग जे झालं ते हैराण करणारं आहे.

ही घटना अमेरिकेतील आहे. हा मुलगा एक्स-मॅन सुपरहिरो मर्क्युरीने प्रेरित होता आणि त्याला त्याच्यासारखं व्हायचं होतं. दिवसभर त्याच्यासारखाच अभिनय करत राहत होता. एक दिवस त्याला वाटलं की, सुपरहिरोच्या शरीरात कदाचित मर्क्युरी आहे. त्यामुळेच तो हे सगळं काही करू शकतो. यानंतर त्याने स्वत:मध्ये सुपरपॉवर निर्माण करण्याच्या नादात पाऱ्याचं इंजेक्शन टोचून घेतलं. पण सुपरपॉवर मिळण्याऐवजी त्याची हालत खराब झाली. कुटुंबिय त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेव्हा समजलं की, त्याच्या शरीरात अनेक ठिकाणी अल्सर झाले होते. जे बरे केले जाऊ शकत नव्हते.

डॉक्टरांना हे समजलं नाही की, त्याने नेमकं काय केलं होतं. नंतर सायकॉलॉजिस्टची मदत घेण्यात आली. तेव्हा कुठे मुलाने सांगितलं की, त्याने मुद्दामहून पाऱ्याचं इंजेक्शन टोकून घेतलं होतं. पारा त्याला थर्मामीटरमध्ये सापडला होता. त्याने हे सगळं सुपरपॉवर मिळवण्याच्या नादात केलं होतं. याआधीही त्याने एकदा सुपरमॅन बनण्याच्या नादात अनेकदा कोळींकडून दंश मारून घेतला होता. डॉक्टर म्हणाले की, त्याला कोणताही मानसिक आजार नाही. त्याची आयक्यू लेव्हलही सामान्य आहे.

सुदैवाने मुलाने जे पाऱ्याचं इंजेक्शन घेतलं होतं ते केवळ त्वचेच्या खाली होतं. पारा नसांमध्ये पोहोचला नव्हता. असं झालं असतं तर रक्त गोठलं असतं आणि लगेच त्याच्या मृत्यू झाला असता. 

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉर्मेशनच्या एका रिपोर्टमध्ये या केसचा तपशील देण्यात आला आहे. त्यात लिहिण्यात आलं की, कशाप्रकारे अल्सर खास वैज्ञानिक पद्धतीने काटून काढण्यात आले. अनेकदा सर्जरी केल्यानंतर आता त्याची स्थिती ठीक आहे. डॉक्टरांनी इशारा दिला की, मुलांनी अशा गोष्टी करू नये. कारण या जीवघेण्या ठरू शकतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका