शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बॉस असावा असा! कर्मचाऱ्यांना दिली महिन्याभराची सुट्टी; 1 दिवसाचाही कापला नाही पगार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 12:31 IST

एका बॉसने असंच काहीसं केलं आहे, ज्याची जगभरात सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

एखाद्या ठिकाणी काम करत असताना कंपनीकडून जास्तीत जास्त सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना काही वेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात, परंतु काही ठिकाणी असं काही दिलं जातं जे  एक खास उदाहरण ठरतं. एका ब्रिटिश बॉसने असंच काहीसं केलं आहे, ज्याची जगभरात सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

एका ब्रिटिश कंपनीच्या सीईओने ऑफिस कल्चरबाबत वेगळं उद्दिष्ट दिलं. आपल्या कंपनीत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांनी महिनाभर रजेवर पाठवले. ही कोणती शिक्षा नव्हती. किंबहुना या काळात सर्वांना त्यांचा पगार देण्यात आला. आता तुम्हीही विचार करत असाल की असं कसं झालं असेल?

एक महिन्याची पगारी रजा

64 Million Artists असं या कंपनीचं नाव आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, कंपनीचे सीईओ जो हंटर यांनी हा निर्णय घेतला होता आणि आपल्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याची सुट्टी दिली होती, तीही पूर्ण पगारासह. उत्पादकता वाढवण्यासाठी त्यांनी हे केले आणि त्यांचा असा विश्वास आहे की, जर बॉस त्यांच्या कर्मचार्‍यांशी चांगलं वागला तर ते देखील मनापासून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात.

कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना असा दिलासा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. कोरोना महामारीच्या काळातही कंपनीने कर्मचाऱ्यांना फक्त 4 दिवस काम करण्याची परवानगी दिली होती. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात सुट्टी दिली कारण त्यांच्या मते यावेळी कमीत कमी काम केले जाते. त्यांचे काम शिक्षण क्षेत्राशी निगडीत असल्याने उन्हाळ्यात काम कमी होते आणि तेव्हाच त्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली.  

टॅग्स :Jara hatkeजरा हटके