शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हनीमुनच्या दिवशी झालं असं काही की बायकोने विचारलं, मी लग्नच का केलं तुझ्याशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 18:44 IST

नवीन लग्न असतानाच कोणच्या बायकोवर त्याचं चुकीचं इम्प्रेशन पडलं तर? मग बायकोला गैरसमज होणारच. लग्नानंतर हनीमूनसाठी कंबोडियाला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत असंच काहीसं घडलं आहे.

नवविवाहित जोडप्यासाठी हनीमून हा सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे. लग्न झाल्यानंतर एकमेकांना ओळखण्यासाठी आणि आनंदाचे क्षण जगण्यासाठी बरेच लोक हनीमून जातात. परंतु विचार करा जर हाच तुमचा दिवस खराब झाला किंवा नवीन लग्न असतानाच कोणच्या बायकोवर त्याचं चुकीचं इम्प्रेशन पडलं तर? मग बायकोला गैरसमज होणारच. लग्नानंतर हनीमूनसाठी कंबोडियाला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्यासोबत असंच काहीसं घडलं आहे.

आता जरा विचार करा, या काळात तुम्हाला ऑफिसमधील काही महत्वाचे काम करण्यासाठी बॉसने तुम्हाला पुन्हा बोलवलं तर? नक्कीच तुम्ही खूप दुःखी व्हाल आणि तुमचा जोडीदारही निराश होईल.  अमेरिकेत राहणार्‍या एका व्यक्तीने Reddit वर सांगितले की, या वर्षी जानेवारीमध्ये तो हनीमून साजरा करण्यासाठी कंबोडियाला गेला होता. इतक्यात ऑफिसमधून त्याला बॉसचा फोन आला आणि त्यांनी काही तातडीच्या कामासाठी एक दिवस त्याला ऑफिसला यायला सांगितलं. हे ऐकून तो चिडला, कारण तो हनीमूनसाठी सुट्टी घेऊनच कंबोडियाला आला होता. ज्यामुळे तो एका दिवसासाठी इतक्या लांबून येऊ शकत नव्हता.

Reddit पोस्टमध्ये, त्या व्यक्तीने लिहिले की, 'मी नुकतेच लग्न केले आहे आणि कंबोडियामध्ये माझ्या हनीमूनसाठी गेलो होतो. मला आणि माझ्या पत्नीला अनेकदा कामातून सुट्टी मिळत नव्हती. त्यामुळे अनेक प्रयत्नानंतर आम्हाला या सुट्ट्या मिळाल्या होत्या, ज्या आपल्यासाठी खास होत्या. मी १ जानेवारीला रजेसाठी अर्ज केला होता, जो दुसऱ्याच दिवशी बॉसने मंजूर केला होता.'

त्या व्यक्तीने पुढे लिहिले की, 'परंतु असे असून देखील माझा बॉस आता मला हनीमूनच्या तिसऱ्या दिवशी क्लायंटच्या पिच मीटिंगला उपस्थित राहण्यास सांगत आहे. बॉसने त्याला सांगितले की, ही मिटींग खूप महत्त्वाची आहे आणि त्याला फक्त एका दिवसासाठी माझी गरज आहे. त्याला उत्तर देताना मी म्हणालो की हा माझा हनिमूनचा काळ आहे आणि मी कोणत्याही अटीवर तिथे येऊ शकत नाही. यावर बॉस म्हणाला, की ही फक्त एका दिवसाची बाब आहे आणि जर या महत्वाच्या बैठकीसाठी मी आलो नाही तर तो माझ्याबरोबर एक टीम म्हणून पुढे जाऊ शकणार नाही.'

या संपूर्ण प्रकरणावर पत्नीशी बोलल्यानंतर आता हा व्यक्ती दोन कठोर निर्णयांमध्ये अडकला आहे. त्याला भीती वाटते की एकतर बॉस त्याला काढून टाकेल किंवा त्याला हनीमूनला पुन्हा प्लॅन करावा लागेल. परंतु दुसरीकडे, तो जेव्हा त्याच्या बायकोला यासंदर्भात विचारतो, तेव्हा त्याच्या बायकोला, या सगळ्या प्रकारामुळे आपण लग्नच का केलं हा प्रश्न पडला आहे. सहाजिकच ती खूप रागवली असणार यात काही शंका नाही. परंतु आता बायको आणि नोकरी या दोन महत्वाच्या गोष्टींमध्ये हा व्यक्ती पूरता फसला असणार हे नक्की. पुढे त्याचं काय झालं हे काही कळलेलं नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके