अरेरे! 'त्याने' कचऱ्यात फेकला तब्बल 2000 कोटींचा 'खजिना' अन् आता...; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 12:55 PM2022-08-05T12:55:01+5:302022-08-05T12:56:34+5:30

Bitcoin In Garbage : आपण आता जे कचऱ्यात फेकत आहोत त्याची किंमत काही वर्षांनी हजारो कोटी रुपये होणार आहे याचा अर्थातच जेम्सला त्यावेळेस अंदाज नव्हता.

Bitcoin In Garbage james howells threw 2000 crore rupees bitcoin hard drive in garbage | अरेरे! 'त्याने' कचऱ्यात फेकला तब्बल 2000 कोटींचा 'खजिना' अन् आता...; नेमकं काय घडलं? 

फोटो - झी न्यूज

googlenewsNext

कधी कधी आपल्याकडून नकळत मौल्यवान वस्तू या कचरापेटीत फेकल्या जातात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या जेम्स हॉवेल्स (James Howells) याने 9 वर्षांपूर्वी म्हणजे 2013 मध्ये त्याच्याकडील हार्ड ड्राईव्ह (Hard Drive) फेकून दिला. या हार्ड ड्राईव्हमध्ये बिटकॉईन (Bitcoin) स्टोअर केलेले होते. या हार्ड ड्राईव्हमधील बिटकॉईनची किंमत आता 261 मिलियन म्हणजे 2 हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाली आहे. 

आपण आता जे कचऱ्यात फेकत आहोत त्याची किंमत काही वर्षांनी हजारो कोटी रुपये होणार आहे याचा अर्थातच जेम्सला त्यावेळेस अंदाज नव्हता. ब्रिटनमधल्या न्यूपोर्ट (Newport) इथली ही घटना असल्याचं न्यूज डॉट कॉम डॉट एयूमधील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. आता रोबो डॉग (Robot Dog) च्या मदतीने जेम्स आपला हार्ड ड्राईव्ह शोधून काढणार असल्याची माहिती आहे.जेम्स हॉवेल्स हा व्यवसायानं आयटी इंजिनीअर आहे. 

हजारो कोटी रुपयांचे बिटकॉईन्स असलेला हार्ड ड्राईव्ह शोधण्यासाठी आता जेम्स 150 कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च करायला तयार असल्याचंही सांगितलं जात आहे. व्यावसायिक पद्धतीने हा हार्ड ड्राईव्ह शोधला जाईल असं जेम्स हॉवेल्सने सांगितलं. अशाप्रकारची मोहीम नासाने या पूर्वी हाती घेतली होती. लँडफिलमध्ये (Landfill) हार्ड ड्राईव्ह शोधला जाणार आहे. कोलंबियात AI फर्मच्या मदतीने 2003 मध्ये एक हार्ड ड्राईव्ह स्पेस शटल डिझास्टरच्या मदतीने शोधण्यात आलं होतं.

न्यू पोर्ट सिटीच्या लँडफील्डमध्ये हार्ड ड्राइव्ह शोधण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागू शकतो. पहिल्यांदा न्यूपोर्ट महानगरपालिकेने या तीन वर्ष चालणाऱ्या हार्ड ड्राइव्ह शोध मोहिमेमुळे इकॉलॉजिकल रिस्क आहे असं मत व्यक्त केलं होतं पण नंतर ही मोहीम सुरू करायला परवानगी दिली आहे. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. झी न्यूज हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Bitcoin In Garbage james howells threw 2000 crore rupees bitcoin hard drive in garbage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.