शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सात लाख खर्चून नॅनोचे केले हेलिकॉप्टर, बिहारमधील तरुण ठरतोय आकर्षणाचे केंद्रबिंदू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 03:40 IST

हेलिकॉप्टरसारखी दिसणारी ही कार सध्या छापरामध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

छापरा (बिहार) : हेलिकॉप्टरचे डिझाईन करण्याची आणि ते चालविण्याची इच्छा पूर्ण करू न शकलेल्या मिथिलेश प्रसाद (२५, रा. छापरा) याने त्याच्याकडील टाटा नॅनो कारला ती हेलिकॉप्टरसारखी दिसेल, असे स्वरूप दिले. हेलिकॉप्टरसारखी दिसणारी ही कार सध्या छापरामध्ये चर्चेचा विषय बनली आहे.मिथिलेशचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय हा पाईप फिटिंगचा. तो मूळचा बनियापूरमधील सिमारा खेड्याचा. त्याने हेलिकॉप्टरमध्ये ज्या मूळ गोष्टी असतात त्या टाटा नॅनो कारमध्ये समाविष्ट करून तिला हेलिकॉप्टरचे रूप दिले.भलेही ही कार उडणारी नाही तरी पारंपरिक हेलिकॉप्टरसारखी (मेन रोटोर, टेल बूम आणि टेल रोटोर) ती दिसते. रोटोर्स आणि साईड पॅनल्सही रंगीत एलईडी लाईटस्ने बसवण्यात आले आहेत.कारला पूर्णपणे हेलिकॉप्टरमध्ये रूपांतरित करण्यासाठी मिथिलेश आणि त्याच्या भावाला जवळपास सात महिने लागले. या कारचे हेलिकॉप्टरमध्ये रूपांतर प्रकल्प अमलात आणण्यासाठी सात लाख रुपयांची गुंतवणूकही त्यांना करावी लागली.आपल्या या निर्मितीबद्दल बोलताना मिथिलेश म्हणाला, ‘मी स्वत: हेलिकॉप्टरची बांधणी करून ते उडवतोय, हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते; परंतु मला आर्थिक आधार नसल्यामुळे मी माझ्या कारचे रूपांतर ती हेलिकॉप्टरसारखी दिसेल, असे केले.’ (वृत्तसंस्था)मोठा आनंद मिळतोमिथिलेश प्रसादचे शिक्षण बारावी उत्तीर्ण. आपण हेलिकॉप्टर्स बनवावेत हे त्याचे नेहमीचे स्वप्न. तो हेलिकॉप्टर चालवू शकत नसला तरी आपली टाटा नॅनो हेलिकॉप्टर कार चालवताना त्याला मोठा आनंद आणि समाधान मिळते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेBiharबिहार