शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! नाराज होऊन पत्नी माहेरी गेल्यावर पठ्ठ्याने असा कारनामा केला की तुरूंगात रात्र काढावी लागली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 16:43 IST

पत्नी माहेरी गेल्यावर कंटाळलेल्या पतीने ५०० किलोमीटरचा प्रवास स्कूटीवर केला. पण यादरम्यान असं काही झालं की, त्याला पोलीस स्टेशनमध्ये रात्र काढावी लागली.

पती आणि पत्नीतील प्रेमाचे अनेक किस्से तुम्ही ऐकलं किंवा पाहिले असतील. अशीच एक पतीचं पत्नीवरील प्रेम दाखवणारी घटना बिहारच्य पूर्णियामधून समोर आली आहे. इथे पत्नी माहेरी गेल्यावर कंटाळलेल्या पतीने ५०० किलोमीटरचा प्रवास स्कूटीवर केला. पण यादरम्यान असं काही झालं की, त्याला पोलीस स्टेशनमध्ये रात्र काढावी लागली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील संदीप कुमारचं लग्न दोन वर्षाआधी झालं होतं. पत्नी माहेरी गेल्यावर तो असा काही नाराज झाला की, स्कूटीने तो ४९५ किलोमीटरचं अंतर पार करत पूर्णियाला पोहोचला. (हे पण वाचा : २८ बायका, १३५ मुले आणि १२६ नातवंडांसमोर 'या' व्यक्तीने केलं असं काही, लोक झाले हैराण)

पोलिसांनी पुढे सांगितले की, शनिवारी रात्री त्याला प्रवास करताना काही वाईट लोकांनी त्रास दिला. त्यामुळे त्याने रात्र घालवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस अधिकारी संजय कुमार सिंह यांनी सांगितलं की, संदीप कुमारचं त्याच्या पत्नीवर खूप प्रेम आहे. पण अचानक त्याची पत्नी माहेरी केली. अनेक प्रयत्न करूनही ती परतली नाही तेव्हा तो स्वत; तिला भेटण्यासाठी निघाला होता. (हे पण वाचा : लेडी बाहुबली! गॅस सिलेंडरसोबत वर्कआउट करते ही महिला, तेही नाडी नेसून; व्हिडीओ व्हायरल)

त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी जेव्हा त्याला ओळखपत्र दाखवण्यास सांगितलं तर तो दाखवू शकला नाही. अशात त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी कुशीनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला. संदीपच्या वडिलांनी पूर्णिया पोलिसांना त्याला पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्याची विनंती केली. 

संदीपचे वडिल बृज बिहारी सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, संदीपची पत्नी माहेरी गेल्यापासून तो जरा निराश आहे. त्यानंतर पूर्णिया पोलिसांनी संदीपचं त्याच्या पत्नीसोबत बोलणं करून दिलं. पत्नीही परत येण्यास तयार झाली. पोलीस म्हणाले की, संदीपचा पूर्णियाशी काहीच संबंध नाही तो बस भकटत तिथे पोहोचला होता. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेBiharबिहार