शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Tiger News:नेपाळची वाघीण अन् भारताचा वाघ; प्रेमसंबंधांत अडसर होणाऱ्या बछड्याचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 14:36 IST

Tiger News: वाघिणीच्या प्रेमापोटी वाघाने दुसऱ्या वाघाला मारल्याची ही पहिलीच घटना घडली आहे.

तुम्ही अनेकदा प्रेमात अडथळा आल्याने प्रेमी युगूलांकडून इतरांचा खून झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. पण, प्राण्यांमध्येही अशी घटना घडली तर...? बिहारच्या सीमावर्ती भागात अशाच प्रकारची घटना घडली आहे. नेपाळच्या वाघिणीच्या प्रेमापोटी भारताच्या वाघाने आठ महिन्यांच्या मादी पिल्लाचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. वाघ आणि वाघिणीच्या मेटिंगमध्ये हे पिल्लू अडथळा ठरत होते, त्यामुळेच वाघाने त्याला आपल्या मार्गातून दूर केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात ही घटना घडली आहे. काळेश्वर मंदिराच्या कंपाऊंड क्रमांक टी-1 मध्ये पिलाचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. सोनहा नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण नेपाळ सीमेवर आहे. सोनहा नदी दोन्ही देशांच्या सीमांना विभाजित करते. तिथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी 8 महिन्यांच्या बछड्याचा मृतदेह आढळून आला. शावकाचा अचानक मृत्यू झाल्याने वनविभाग सतर्क झाला, विभागाने एक पथक तयार करून मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. 

मेटींगमध्ये अडथळा    वनसंरक्षक हेमकांत राय यांनी सांगितले की, 3 आणि 4 जानेवारी रोजी या भागाजवळ वाघिणीचे दर्शन झाले होते. ती वाघिण नेपाळची असल्याचे आढळून आले. त्याचवेळी या परिसरात एक भारतीय वाघही दिसला होता. वाघ आणि वाघिण मेटींग करत होते, पण यात शावक अडथळा ठरत होता. त्यामुळेच वाघाने त्या पिलाला मारुन टाकले. 

वाघिण नेपाळच्या दिशेने गेलीव्हीटीआरचे संचालक कम मुख्य वनसंरक्षक हेमकांत राय संपूर्ण टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि पिलाचा मृतदेह सुरक्षित सापडल्याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी पिलाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली आहे. मृत शावकाच्या मानेवर आणि डोक्यावर दातांच्या आणि नखांच्या खुणा आहेत. इतर शरीरावर कोणतीही जखम किंवा जखमेचे चिन्ह दिसत नाही. या जखमांवरुन त्या वाघाच्या पिलाला दुसऱ्या मोठ्या वाघाने ठार केल्याचा अंदाज लावण्यात आला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सTigerवाघ