शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडनं मागितला चंद्राचा तुकडा; त्यानं थेट १ एकर भूखंडच विकत घेतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 19:39 IST

प्रेयसीकडून प्रेरणा घेत थेट चंद्रावरील जमिनीची खरेदी

बोधगया: तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणून, असं अनेक प्रियकर त्यांच्या प्रेयसीला म्हणतात. मात्र प्रत्यक्षात हे काही शक्य नसतं. बिहारमधल्या एका तरुणानं मात्र प्रेयसीचा हा हट्ट पूर्ण केला आहे. नीरज कुमार गिरी नावाच्या व्यवसायिकानं त्याच्या प्रेयसीसाठी चंद्रावर एक एकर जमीन खरेदी केली आहे. यासाठी नीरज यांनी जवळपास दीड वर्ष मेहनत घेतली. चंद्रावर जमीन खरेदी करणारे ते चौथे भारतीय ठरले आहेत. बिहारच्या बोधगयामध्ये राहणाऱ्या नीरज यांनी चंद्रावर भूखंड खरेदी केला आहे. त्यांच्याआधी आणखी एका व्यवसायिकानं चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. याशिवाय अभिनेता शाहरुख खान आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूचनंदेखील चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारचा होता. मात्र त्यानं जमीन खरेदी करताना मुंबईचा पत्ता दिला होता. त्यामुळे चंद्रावर जमीन खरेदी करणारा नीरज बिहारमधील पहिलेच ठरले आहेत.नीरज यांनी २९ ऑक्टोबर २०१९ मध्ये लूनर सोसायटी इंटरनॅशनलच्या माध्यमातून जमिनीची ऑनलाईन नोंदणी केली. त्यानंतर सोसायटीनं त्यांच्याकडून कागदपत्रं मागवली. नीरज यांनी निश्चित करण्यात आलेली रक्कम खात्यात जमा केली. जमिनीच्या किमतीपेक्षा ती खरेदी करण्याची प्रक्रिया जटिल आणि गुंतागुंतीची असल्याचं नीरज यांनी सांगितलं. २२ जून २०२० रोजी एका ईमेलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर चंद्रावरील एक एकर जमिनीची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली.