शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

काळ्या जादूने एक्स बॉयफ्रेंडला वश करण्यासाठी तरूणीने गमावले लाखो रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 17:11 IST

आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तरूणी बिथरली होती. तेव्हा तिला अहमद नावाच्या एका बाबाची माहिती मिळाली.

असं म्हटलं जातं की, प्रेमात काही गैर नसतं. पण एका तरूणीला तिच्या जुन्या बॉयफ्रेंडला आपल्याकडे आकर्षित करणं महागात पडलं. बंगळुरूच्या 25 वर्षीय तरूणीला वाटत होतं की, तिचा आधीचा प्रियकर तिच्याकडे परत यावा. पण तिला हे नव्हतं माहीत की, तिला यासाठी 8.20 लाख रूपये गमवावे लागतील. 

मीडिया रिपोर्टनुसार, आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तरूणी बिथरली होती. तेव्हा तिला अहमद नावाच्या एका बाबाची माहिती मिळाली. तरूणीने अहमदला ऑनलाईन कॉन्टॅक्ट केला त्याने सांगितलं की, तरूणी, तिचे मित्र आणि परिवारावर काळी जादू करण्यात आली आहे. ज्यामुळे तिला जीवनात समस्या येत आहेत. यावर त्याने काही उपाय सांगितले. ज्यासाठी त्याने तिच्याकडे 501 रूपये मागितले.

तरूणी त्याला पैसे ऑनलाईन पाठवले, ज्यानंतर अहमदने तरूणीकडे तिचे, परिवारातील लोकांचे आणि मित्रांचे फोटो मागितले. यानंतर अहमदने तरूणीला सांगितलं की, जर तिने 2.4 लाख रूपये दिले तर तो तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या परिवारावर काळी जादू करू शकतो. यानंतर कुणीही तिच्या नात्याविरोधात जाणार नाही.

तरूणी अहमदच्या बोलण्यात आली आहे आणि 22 डिसेंबरला त्याला 2.4 लाख रूपये रोख दिले. काही दिवसांनी अहमदने तिला आणखी 1.7 लाक रूपये मागितले. यावर तरूणीला संशय आला आणि तिने अहमदला पैसे देण्यास नकार दिला. यावर अहमजने तरूणीला धमकावणं सुरू केलं की, तो तिचे आई-वडील, तिचा एक्स बॉयफ्रेंड सगळ्यांचे फोटो शेअर करेल. तरूणी यामुळे घाबरली आणि तिने त्याला आणखी 4.1 लाख रूपये दिले.

तरूणीसोबत झालेल्या या फसवणुकीची माहिती तिच्या आई-वडिलांनाही लागली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना चौकशीदरम्यान समजलं की, हे सगळे पैसे अहमदने त्याचा साथीदार लियाखातुल्लाच्या खात्यात ट्रांसफर करायला सांगितले होते. अहमद म्हणाला की, तरूणीने काळी जादू करण्यासाठी त्याला भाग पाडलं आणि तो लवकर तिचे पैसेही परत करेल. सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेrelationshipरिलेशनशिप