शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तमंचा गर्ल! हातात पिस्तुल घेऊन नाचत होती बार डान्सर, व्हिडिओ व्हायरल होताच सत्य समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 17:40 IST

भोजपुरी गाण्यावर डान्स करताना तिने स्टेजवर अनेकवेळा बंदूक हवेत फिरवली. यादरम्यान त्या तरुणीसोबत इतर अनेक तरुणही डान्स (Tamanche Pe Disco Video) करत होते.

बिहारमधील नालंदामधून असं एक प्रकरण समोर आलं आहे, जे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. लग्न समारंभात बार गर्ल स्टेजवर डान्स करताना दिसली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या हातात एक नाही तर दोन बंदूक होत्या (Girl Dances Around With Gun in Hand). भोजपुरी गाण्यावर डान्स करताना तिने स्टेजवर अनेकवेळा बंदूक हवेत फिरवली. यादरम्यान त्या तरुणीसोबत इतर अनेक तरुणही डान्स (Tamanche Pe Disco Video) करत होते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नालंदामधील नूरसराय पोलीस स्टेशन क्षेत्रातील डोईया गावातील आहे.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, ही बाब याच महिन्यातील १३ एप्रिलची आहे, जेव्हा चेला पासवास यांनी गावात मुलीच्या लग्नानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी बार गर्ल्सनाही बोलावण्यात आलं होतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, डान्स करताना या बाला हातात बंदूक धरून उभा आहेत.

तिथले काही लोक तिच्यासोबत डान्स करताना दिसतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे पाचवेळा राउंड फायरिंगही करण्यात आली होती. बार बालासोबत स्टेजवर ठुमका लगावणारा पिंटू कुमार हा चेला पासवान यांचा मुलगा आहे. स्थानिक पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली असून त्यांनी तपास सुरू केला आहे.

बार बाला बंदूक घेऊन नाचतानाचा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. 'सीधे राइफल के नोक पर टंगा जाइवा' या भोजपुरी गाण्यावर रायफल दाखवत तरुणीने डान्स केला. बिहारमधील हे असं पहिलं प्रकरण नाही, याआधीही अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. यूजर्स आता या व्हिडिओला 'तमंचे पर डिस्को' म्हणत ट्रोल करत आहेत. बेकायदेशीर शस्त्रे यापूर्वीही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके