शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

या बाळाला अमेरिकेत म्हटलं जातंय 'बेबी गोरीला', पूर्ण अंगावर इतके केस असण्याचं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 17:09 IST

अमेरिकेत एका चार महिन्यांच्या मुलावर एका औषधाचा इतका दुष्परिणाम झाला की त्याच्या संपूर्ण शरीरावर केस वाढले. अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत हाइपरइंसुलिनिस्म (Hyperinsulinism) म्हणतात.

तुम्ही आतापर्यंत अनेक दुर्मिळ आजारांबद्दल ऐकलं असेल. अनेकदा औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण आता तुम्ही जे सांगणार आहात, कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. अमेरिकेत एका चार महिन्यांच्या मुलावर एका औषधाचा इतका दुष्परिणाम झाला की त्याच्या संपूर्ण शरीरावर केस वाढले. अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत हाइपरइंसुलिनिस्म (Hyperinsulinism) म्हणतात.

जेव्हा पालकांना त्याच्या मुलाच्या दुर्मिळ आजाराबद्दल कळलं तेव्हा त्यांनी बाळाच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपचार सुरू केले. ज्यामुळे मुलाचं आरोग्य सुधारलं पण त्याचे दुष्परिणामही झाले. त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यावर लोकांनी अत्यंत विचित्र प्रतिक्रिया दिल्या. मात्र यावर 'लोकं काय विचार करतात याची मला पर्वा नाही, मी फक्त माझ्या मुलाबरोबर आनंदी आहे,' असं मत बाळाच्या आईने व्यक्त केलं.

मुलाच्या आईने सोशल मीडिया आणि नेटीझन्सना सांगितलं की, तिच्या मुलाला रोगाशी लढण्यासाठी डायझॉक्साईड औषध द्यावं लागतंय. औषधाच्या दुष्परिणामामुळे त्याच्या शरीरावर दाट आणि केस वाढू लागले. हळूहळू केस संपूर्ण शरीरावर आले. यानंतर बाळाच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायांवर केस दिसू लागले.

या बाळाचं नाव मातेओ हर्नांडेझ आहे. जेव्हा तो अवघ्या एका महिन्याचा होता, तेव्हा त्याला हाइपरइंसुलिनिस्म नावाच्या आजाराचं निदान झालं. डेली मेलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या आजारात, स्वादुपिंडातून हाय लेवलंच इन्सुलिन तयार होऊ लागतं. ही रक्तातील साखरेशी संबंधित समस्या आहे. हा दुर्मिळ आजार मानला जातो कारण ५० हजार मुलांपैकी एकाला हा आजार होण्याची शक्यता असते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका