शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अंतराळात सुरु होतंय लक्झरी हॉटेल, जाणून घ्या किती येणार खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 17:58 IST

लवकरच अंतराळात एक लक्झरी हॉटेल बनवण्याची तयारी सुरु आहे. 2022 पर्यंत हे हॉटेल तयार होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

(Image Credit : www.cnn.com)

तुम्ही अनेकदा मोठ्या आणि शानदार हॉटेल्समध्ये वेळ घालवला असेल. कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत तुम्ही कुठे बाहेर गेला असाल तर हॉटेल नक्कीच सर्च केलं असेल. पण आता जर तुम्हाला पृथ्वीऐवजी अंतराळातील लक्झरी हॉटेलमध्ये सुट्टी घासवण्याची संधी मिळाली तर? होय! तुम्ही योग्य वाचत आहात. लवकरच अंतराळात एक लक्झरी हॉटेल बनवण्याची तयारी सुरु आहे. 2022 पर्यंत हे हॉटेल तयार होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

ऑरोरा स्टेशन असेल नाव

या हॉटेलचं नाव ऑरोरा स्टेशन असणार आहे. हे हॉटेल तयार करण्याची घोषणा अमेरिकेतील स्पेस टेक्नॉलॉजी स्टार्ट-अप 'ओरियन स्पेन'  ने केली आहे. अंतराळात तयार होणा-या या हॉटेलची लांबी 43.5 फूट आणि रुंदी 14.01 फूटाची असणार आहे. पृथ्वीच्या कक्षेपासून 321 किमी दूर हे हॉटेल तयार केलं जाणार आहे. 

केवळ चार प्रवाशांसाठी जागा

आकाशात राहण्याचा आनंद देणा-या या हॉटेलचा आकार एका प्रायव्हेट जेटसारखा असेल. हे जेटची 90 मिनिटांचा प्रवास करण्याची क्षमता असेल.  या हॉटेलमध्ये दोन क्रू मेंबर्ससह चार प्रवाशी राहू शकतील इतकी जागा असेल.  

हॉटेलपर्यंत पोहचण्याला किती वेळ आणि किती खर्च

अंतराळात तयार होणा-या या हॉटेलमध्ये पोहोचण्यासाठी 12 दिवस लागणार आहेत. आता या हॉटेलमध्ये जाण्यासाठी किती खर्च येणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर या हॉटेलमध्ये राहण्यासाठीचा खर्च हा 9.5 मिलियन म्हणजेच 61 कोटी रुपये इतका लागणार आहे.

हॉलिवूड कलाकारांनी केली अॅडव्हांस बुकिंग

या हॉटेलमध्ये राहण्यासाठी 51 लाख रुपयांमध्ये अॅडव्हांस बुकिंग सुरु आहे. आत्तापर्यंत हॉलिवूड सेलिब्रिटी टॉम हॅक्स, लियोनार्डो डिकॅप्रियो आणि कॅटी पेरीने अॅडव्हांस बुकिंग केलं आहे. 

टॅग्स :hotelहॉटेलJara hatkeजरा हटके