शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मराठ्यांनी जिंकलेला 'हा' किल्‍ला आज आहे पाकिस्तानात, पण अनेकांना माहीत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 13:53 IST

Interesting Facts : इतकेच काय तर पाकिस्तानातील एक किल्लाही मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. तो किल्ला म्हणजे 'अटकेला किल्‍ला'. चला जाणून घेऊ याबाबत....

Interesting Facts : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेली स्वराज्य स्थापनेची घौडदौड त्यांच्यानंतरही मराठ्यांनी सुरू ठेवली होती. पेशव्यांनी भारताच्या वेगवेगळ्या भागात स्वराज्याचा ध्वज फडकावला होता. इतकेच काय तर पाकिस्तानातील एक किल्लाही मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. तो किल्ला म्हणजे 'अटकेला किल्‍ला'. चला जाणून घेऊ याबाबत....

कुठे आहे हा किल्ला?

28 एप्रिल 1757 रोजी रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्‍वात थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांनी अत्‍यंत खडतर प्रवास करून आताच्‍या पाकिस्‍तानात असलेला अटकेला किल्‍ला जिंकला होता. हे शहर पाकव्‍याप्‍त पंजाब प्रांतांतील तालुक्‍याचे ठिकाण आहे. येथील सिंधूनदीच्या काठावर अटकचा किल्ला आहे. पूर्वीच्‍या काळी ही नदी पार करून किल्‍ल्‍यावर पोहोचणे अत्‍यंत अवघड होते. मात्र तरी सुद्धा आपल्या शौर्याने मराठ्यांनी हा किल्‍ला काबिज केला होता.

मराठ्यांना कसा मिळाला किल्ला?

भारतावर डोळा असलेला अब्दाल मुघल साम्राज्यावर आक्रमण केले होते. अशावेळी मराठ्यांनी मुघलांची मदत करावी असा करार मराठे आणि मुघलांमध्ये झाला होता. त्यानुसार रघुनाथराव पेशव्यांनी मोहीम आखली. यातच मराठ्यांनी आताच्या पाकिस्तानातील अटकेचा किल्ला जिंकला होता.

आता किल्ल्यावर काय आहे?

हा किल्ला आता पर्यंटकांसाठी आकर्षण आहे. इथे तोफखाना आहे. किल्याच्या समोरच कमालिया व जलालिया नावाच्या काळ्या दगडांच्या कड्यांमध्यें सिंधू नदीच्या पात्रांत भोवरे आहेत. तर नदीच्या वरच्या बाजूस, अटकपासून 16 मैलांवर, ओहिंद येथे होड्यांचा पूल करून अलेक्झांडर नदीपार आला असे म्हणतात. आता हा किल्ला पाकिस्तानच्या सैन्याचं केंद्र आहे.

कुणी बांधला? 

अकबराने हा किल्ला बांधला होता. त्याचे नाव अटक-बनारस असे ठेवले. 1812 तरणजितसिंहाने या किल्ल्यावर आक्रमण केले होता. पहिल्या शीख युद्धांत इंग्रजांनी हा किल्ला घेतला होता. परंतु, दुसऱ्या युद्धांत तो त्यांना कायम ठेवता आला नाही. नंतर हा किल्ला शीख शीख लोकांकडून इंग्रजांच्या ताब्यात गेला.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सFortगडhistoryइतिहास