शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

लोक म्हणतायत हिच्या ओठांमुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका, असं काय दडलंय या ओठांत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 16:54 IST

तिच्या ब्युटीफूल लिप्समुळे तिचं कौतुक केलं जात नाही तर उलट तिला ट्रोल केलं जातं आहे. तिच्या सुंदर ओठांमुळे देशाला धोका असल्याचं लोक म्हणत आहेत.

आपण सुंदर दिसावं असं बहुतेक महिलांना वाटतं. त्यामुळे पार्लरपासून ते कॉस्मेटिक सर्जरीपर्यंत  (Cosmetic Surgery) शक्य ते सर्व उपाय केले जातात. असाच सुंदर दिसण्याचा मोह असलेली एक महिला सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिचे सुंदर ओठ. तिच्या ब्युटीफूल लिप्समुळे तिचं कौतुक केलं जात नाही तर उलट तिला ट्रोल केलं जातं आहे. तिच्या सुंदर ओठांमुळे देशाला धोका असल्याचं लोक म्हणत आहेत.

जॉर्जी गुडे (Georgie Goodey) असं या महिलेचं नाव आहे. २७ वर्षांच्या जॉर्जीने २०१९ साली मिस एसेक्स (Miss Essex) किताब जिंकला होता. गेल्या तीन वर्षांपासून तिने हे नाव राखलं पण आता तिला ऑनलाइन ट्रोल केलं जातं आहे. याला कारण आहे ते म्हणजे तिने केलेली कॉस्मेटिक सर्जरी.

स्वतःचं सौंदर्य अधिक वाढवण्यासाठी तिने नुकतीने तिने लिप फिलर्स करून घेतले. यानंतरचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आणि आता तिला लोक ऑनलाईन ट्रोल करू लागले आहेत. जॉर्जीने आपल्या चांगल्या चेहऱ्याची वाट लावली, असं लोकांचं म्हणणं आहे. लोक तिच्या फोटोंवर नेगिटिव्ह कमेंट्स देत आहेत. जॉर्जीने सांगितलं की १० पैकी ९ कमेंट्स नेगिटिव्ह येत आहेत.

आपल्या ब्युटी ट्रिटमेंट आणि ओठांमुळे ते देशासाठी धोका बनली आहे, असं लोकांनी म्हटलं आहे. आता जॉर्जीच्या ओठांमुळे देशाला धोका कसा काय असू शकेल असा प्रस्न तुम्हाला पडला असेल तर जॉर्जी ही ब्रिटिश आर्मीत सैनिक आहे.  तिचे ओठ खूप मोठे झाले आहेत त्यामुळे शत्रू आता ते दुरूनच पाहू शकतील, असं नेटिझन्स म्हणाले. या एका कमेंटमुळे तिला सर्वात जास्त दुःख झालं आहे. जॉर्जीने सांगितलं की आर्मीतील कडक शिस्तीच्या आयुष्यातून ती या सर्जरीमार्फत स्वतःला थोडा वेळ देऊन स्वतःला सुंदर बनवते, यात चुकीच काय आहे.

जॉर्जीने अशा बऱ्याच कॉस्मेटिक प्रोसिजर करून घेतल्या आहेत. यामध्ये सेमी टॅटू आयब्रोचाही समावेश आहे. याशिवाय ती काही कालावधीने बोटॉक्स ट्रिटमेंटही घेते. सध्या तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील बऱ्याच फोटोंवरील कमेंट सेक्शन बंद केलं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके