शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नाही नाही म्हणणाऱ्याला छतावर जाऊन दिलं वॅक्सीन, गार्ड्सनी धरलं अन् डॉक्टरांनी टोचलं इंजेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 19:20 IST

अजूनही काही लोक असे आहेत ज्यांना वॅक्सीन देण्यासाठी गार्डसोबतच डॉक्टर्सना घरांच्या छतावर चढावं लागत आहे. अजूनही काही लोक वॅक्सीनला इतके घाबरले आहेत की, ते घराचा दरवाजाही उघडायला तयार नाही.

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी जगभरातील सर्वच देशांमध्ये वॅक्सीनेशनचं अभियान वेगाने सुरू आहे. जास्तीत जास्त लोकांना कोरोना वॅक्सीन दिली जावी हा यामागचा उद्देश आहे. पण अजूनही काही लोक असे आहेत ज्यांना वॅक्सीन देण्यासाठी गार्डसोबतच डॉक्टर्सना घरांच्या छतावर चढावं लागत आहे. अजूनही काही लोक वॅक्सीनला इतके घाबरले आहेत की, ते घराचा दरवाजाही उघडायला तयार नाही.

सोशल मीडियावर असाच एक मजेदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की, वॅक्सीन देण्यासाठी हेल्थ वर्कर्सना किती मेहनत घ्यावी लागते. (हे पण बघा : Video: लस घेणाऱ्या महिलेची झाली भयंकर अवस्था; तिला पाहून आजूबाजूचे लोकही घाबरले)

रूपिन शर्मा यांनी यांनी सांगितलं की, हा व्हिडीओ अर्जेंटिनाचा आहे. यात तुम्ही बघू शकता की, काही गार्ड्स आणि डॉक्टर्स एका घराच्या छतावर एका व्यक्तीला पकडून आहे. हे लोक त्याला जबरदस्ती वॅक्सीन लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ती व्यक्ती गार्ड्च्या तावडीतून सुटण्याचा शक्य तो प्रयत्न करत आहे. 

हा व्हिडीओ तेथीलच एक व्यक्तीने तयार केला असून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओवर यूजर्सच्या अनेक मजेदार कमेंट्सही येत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'एक आपण आहोत जे मास्कवरून टोकलं तर पोलिसांची सोशल मीडियावर खरडपट्टी काढतो'. तर दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले की, 'भारतातही असंच व्हायला पाहिजे'.

दरम्यान वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहून वॅक्सीनेशनचं अभियान आणखी वेगाने करण्याची सूचना केली आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना वॅक्सीन दिली जावी. मात्र तरी सुद्धा काही लोक अफवांमुळे वॅक्सीन घेत नाहीयेत. त्यामुळे लोकांना वॅक्सीन देण्यासाठी हेल्थ वर्कर्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

टॅग्स :Argentinaअर्जेंटिनाCorona vaccineकोरोनाची लसSocial Viralसोशल व्हायरल