शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी देणारी कोंबडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 19:37 IST

बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी घालणारी चिनी कोंबडी विक्रीकरिता दाखल झाली. इलाहाबादवरून रामभाऊ नामक दादाजी आपल्या सहा साथीदारांसह या शेकडो कोंबड्या घेऊन शुक्रवारी दाखल झालेत.

परतवाडा (अमरावती) - बहिरमच्या यात्रेत लाल रंगाची अंडी घालणारी चिनी कोंबडी विक्रीकरिता दाखल झाली. इलाहाबादवरून रामभाऊ नामक दादाजी आपल्या सहा साथीदारांसह या शेकडो कोंबड्या घेऊन शुक्रवारी दाखल झालेत. कारंजा-बहिरम रस्त्यालगत त्या विक्रीला ठेवल्यात. दोन ते तीन महिन्यांची वाढ झालेले हे पक्षी करड्या रंगाचे आहेत.या पक्ष्यांची पाचशे रूपये जोडी प्रमाणे विक्री केली जात आहे. एक नर, एक मादी अशी जोडी लावली जात आहेत. देशी कोंबड्यांपेक्षा या पक्ष्याचे (चिनी कोंबडीचे) मांस लुसलुसीत आणि रूचकर असल्याचा दावा रामभाऊ दादाजींनी केला आहे. या पक्ष्यांचे मांस गरम असून, जम्मू-काश्मिरसह थंड प्रदेशात अधिक मागणी  आहे. अलाहाबादहून मोठ्या प्रमाणात हे पक्षी (चिनी कोंबडी) जम्मू-काश्मिरला पाठविले जात असल्याचेही ते म्हणाले.पाच महिन्यांचे झाल्यानंतर ही चिनी कोंबडी रोज एक अंडी देते. त्याचा रंग लाल असतो. सहा महिन्यांनंतर या कोंबडीचे वजन चार ते पाच किलोपर्यंत वाढते. देशी कोंबडीपेक्षा या कोंबडीची अंडी आकाराने मोठी असते. या कोंबडीला चिनी असूनही देशी गावरान कोंबडीचा भाव मिळतो, असेही त्यांनी सांगितले. ही कोंबडी आपल्या दहा ते पंधरा अंड्यावर बसून उबवते.शुक्रवारला यात्रेत फारशी विक्री झाली नाही. शनिवारला काही प्रमाणात हे पक्षी विकल्या गेलेत. रविवारला ते मोठ्या प्रमाणात विकले जातील. कारंजा-बहिरम रस्त्याच्या कडेला आपली गाडी थांबवून, पायी चालणारे आपले चालते पाय थांबवून या पक्षांकडे कुतुहलाने बघत होते. चौकशी करीत होते. बहिरमच्या यात्रेत अनेक चिनी वस्तू विक्रीला आहेत. त्या देशी वस्तूपेक्षा कितीतरी स्वस्त आहेत. पण, चिनी कोंबड्या मात्र देशी कोंबडीपेक्षाही जादा भावाने विकले जात होते.

टॅग्स :AmravatiअमरावतीJara hatkeजरा हटके