शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

निष्णात डॉक्टरांनाही खात्री नव्हती; 'या' सावित्रीनं नवऱ्याला आणलं यमाकडून परत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 09:48 IST

तिच्या नवऱ्याला पिटर्सनला नेमका आजार तरी कोणता झाला होता? एका सुपरबगमुळे पिटर्सनला गलितगात्र करून सोडलं होतं आणि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका तो मोजत होता.

‘हनी.. तुझी ही काय अवस्था झालीय.. मी तुला या अवस्थेत पाहू शकत नाही. तुझ्याशिवाय मी कशी जगू शकेन?.. पण तू तर असा वागतोयंस, जणू काही तुझ्यात जगण्याची इच्छाच राहिलेली नाही. तू तर कशालाच काहीही प्रतिसाद देत नाहीएस... जणू काही तू आत्ताच सगळ्या गाेष्टींच्या पलीकडे गेला आहेत... मी तुझ्याशी काय बोलतेय, हे तुला आत्ता ऐकू येतंय की नाही, तुला कळतंय की नाही, हे मला माहीत नाही; पण एक गोष्ट फक्त कर. तुला जर खरोखरच जगायची इच्छा असेल, तर माझा हात जोरात दाब..’

- असं म्हणून नवऱ्याचा हात हातात घेऊन बराच वेळ ती बसली. तिचा नवरा दवाखान्यात होता. एका असह्य आजारानं तो त्रस्त होता. त्याच्या सगळ्या संवेदना गेल्या होत्या. तो जगेल याची कोणालाच; अगदी जगातल्या निष्णात डॉक्टरांनाही खात्री नव्हती; किंबहुना तो जगणार नाहीच, याचीच शाश्वती तिला सगळ्यांनी दिली होती. पण तिनं हिंमत हरली नव्हती. आताही ती गलितगात्र आणि मरणाच्या दारात असलेल्या आपल्या नवऱ्याच्याच प्रतिक्रियेची वाट पाहत होती. तेवढ्याच तिला जाणवलं, आपल्या नवऱ्यानं आपला हात दाबलाय... तिला फारच आनंद झाला. तिच्या मनाला मोठी उभारी मिळाली; पण पुढच्याच क्षणी निराशेनं तिला पुन्हा घेरलं... या दुर्धर आजारातून आपण त्याला कसं वाचवू शकणार आहोत? मात्र नवऱ्यानं दिलेला हा छोटासा प्रतिसादही तिच्यात दुर्दम्य आशावाद आणि उत्साह पेरून गेला. ती पुन्हा हिरिरीनं कामाला लागली.

कोण ही? - तिचं नाव स्टेफानी स्ट्रॅथडी आणि तिच्या नवऱ्याचं नाव पिटर्सन. ती पेशानं epidemiologist म्हणजे ‘रोगपरिस्थितिविज्ञान’ किंवा ‘महामारीविज्ञाना’ची तज्ज्ञ. सगळे आणि सगळ्यांचे प्रयत्न संपल्यावर शेवटी ही ‘सावित्री’च कामाला लागली आणि आपल्या नवऱ्याला तिनं यमाच्या, मृत्यूच्या दारातून परत आणायचं ठरवलं.

तिच्या नवऱ्याला पिटर्सनला नेमका आजार तरी कोणता झाला होता? एका सुपरबगमुळे पिटर्सनला गलितगात्र करून सोडलं होतं आणि आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका तो मोजत होता. याची सुरुवात झाली हे दोघंही नवरा-बायको जेव्हा नाईल नदीच्या किनारी होते तेव्हा... अचानक पिटर्सनच्या पोटात दुखायला लागलं. असह्य वेदना व्हायला लागल्या. स्टेफानीनं त्याला लगेच इजिप्तमधल्या प्रख्यात डॉक्टरांकडे हलवलं. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; पण त्यांनी हात टेकले. तुझा नवरा यातून वाचणं अशक्यच आहे, हे त्यांनी तिला जणू सांगूनच टाकलं; पण स्टेफानीला हे मान्य होणं शक्यच नव्हतं. 

तिनं पिटर्सनला इजिप्तहून जर्मनीला हलवण्याचा निर्णय घेतला. तिथल्याही जगप्रसिद्ध डॉक्टरांना ती भेटली. त्यांनीही आपलं सारं कौशल्य पणाला लावलं, इतरांचीही मदत घेतली; पण पिटर्सन कोणत्याही उपचारांना काहीही प्रतिसाद देत नव्हता. जर्मनीच्या या डॉक्टरांनीही आपली असमर्थता प्रकट केली; पण स्टेफानीला आपल्या नवऱ्याची साथ सहजासहजी सोडायची नव्हती. शेवटी ती एकटीच उभी राहिली. हा सुपरबग असा आहे तरी काय, याचा शोध, अभ्यास करायला स्टेफानीनं सुरुवात केली. आपल्या नवऱ्याच्या शरीरात घुसलेल्या या सुपरबगला मारलं, तर तो जगू शकेल, याची तिला खात्री होती; पण हा सुपरबग जणू काही ‘अमर’ होता, आहे, जो निदान आत्ता तरी जगातल्या कोणत्याच औषधांना दाद देत नाही. यासाठी स्टेफानीनं काय करावं?... तिनं एक ‘नॅचरल व्हायरस’ तयार केला. त्यासाठी तिनं अक्षरश: गटारी, दलदल, तलाव, सडलेली लाकडं, रानटी गवत, डबकी... ज्या ज्या गलिच्छ ठिकाणी वेगवेगळे जिवाणू वाढतात, तिथले जिवाणू तिनं एकत्र केले आणि त्यांचं ‘कॉकटेल’ तयार करून आपल्या नवऱ्याला पाजलं ! आणि काय आश्चर्य, थोड्याच दिवसांत पिटर्सन एकदम ठणठणीत बरा झाला! पण आपल्या नवऱ्याचे प्राण परत  आणताना तिनं जगावरही उपकार करून ठेवले!

सुपरबग घेईल दर ३ सेकंदाला एक बळीमध्यपूर्वेच्या रेतीत हा सुपरबग आढळतो. इराक यु्द्धात बहुसंख्य अमेरिकी सैनिकांच्या जखमांमध्ये हा सुपरबग आढळून आला होता. त्यामुळे नंतर त्याचं नाव ‘इराकीबेक्टर’ असं ठेवण्यात आलं. दिवसेंदिवस या सुपरबगचा धोका वाढत असून २०५०पर्यंत सुमारे एक कोटी लोकांचा, म्हणजे दर तीन सेकंदांना एका व्यक्तीचा तो जीव घेईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दरवर्षी या सुपरबगमुळे ७० लाख लोक मरतात; पण स्टेफानीच्या या शोधामुळे कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवणं शक्य आहे.