शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

व्हेलने गिळल्यानंतर पोटात काय दिसलं? व्यक्तीने सांगितली त्याची खतरनाक कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 12:15 IST

झालं असं होतं की, मायकलला समुद्रात एका व्हेल माशाने गिळलं होतं. पण व्हेलने त्याला मारण्याआधी तो व्हेलच्या पोटातून बाहेर आला.

अनेकदा आपण एखाद्या अडचणीत सापडतो. त्यातून कसं बाहेर निघावं याचा विचार डोक्यात चालू असतो. अशावेळी डोकं शांत ठेवलं आणि हिंमत दाखवली तर ही अडचण लगेच होऊ शकते. अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत असंच झालं. मायकल पॅकर्ड असं या व्यक्तीचं नाव असून त्याची कहाणी वाचून तुम्हीही अवाक् व्हाल.

झालं असं होतं की, मायकलला समुद्रात एका व्हेल माशाने गिळलं होतं. पण व्हेलने त्याला मारण्याआधी तो व्हेलच्या पोटातून बाहेर आला. या खतरनाक घटनेची कहाणी डेली स्टारने प्रकाशित केली आहे. ज्यात मायकलने तो कसा व्हेलच्या पोटातून बाहेर आला याबाबत सांगितलं आहे.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या प्रोविंसटाउन समुद्र किनाऱ्यावर मायकल स्काय डायव्हिंग करत होता. सगळं काही ठीक सुरू होतं. पण अचानक असं काही झालं जे मायकल कधीही विसरू शकणार नाही. एकाएकी त्याच्या डोळ्यांसमोर अंधार झाला. त्याला याची जाणीव झाली होती की, त्याला व्हेलने गिळलं आहे. त्या क्षणाबाबत सांगताना तो म्हणाला की, "असं वाटलं जणू माझं विश्व अचानक पूर्णपणे काळोखमय झालं आहे. ही घटना २०२१ मध्ये घडली होती. मला असं वाटलं होतं की, एखाद्या कारने मला जोरदार धडक दिली आहे".

त्याने पुढे सांगितलं की, "मी पाण्यात दोन डाईव्ह केल्या आणि तिसऱ्या डाईव्हला जसा मी खाली जात होतो, अचानक मला एक धडक बसली आणि मग सगळीकडे अंधार दिसत होता".

मायकल म्हणाला की, पाणी माझ्या चारही बाजूने वेगाने फिरत होतं, सगळीकडे अंधार होता. मला शरीरावर दबाव जाणवत होता. माझ्या डोक्यात केवळ हेच चालू होतं की, आता माझा मृत्यू जवळ आला आहे.

मायकलला याला अंदाज आला होता की, तो एका व्हेलच्या पोटात आहे. तो यावेळी केवळ मृत्यू, पत्नी आणि मुलांबाबत विचार करत होता. 

अशात जीव वाचवण्यासाठी मायकलने व्हेलला आतून लाथा मारणं सुरू केलं. अचानक व्हेलने आपलं तोंड जोरात हलवलं आणि मायकल काही सेकंदात पुन्हा पाण्यात आला. जवळच असलेल्या क्रू मेंबर जोसिया मायोने पाहिलं की, व्हेलने मायकलला पाण्यात फेकलं. यादरम्यान मायकल साधारण ३० ते ४० सेकंद व्हेलच्या पोटात होता.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल