शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हजारो वर्षानंतर पुन्हा जिवंत होण्यासाठी लोक देत आहेत कोट्यावधी रूपये, लॅबमध्ये गोठवून ठेवले मृतदेह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 14:17 IST

आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेत यावर कामही सुरू आहे. इथे यासाठी एक लॅब आहे ज्यात श्रीमंत लोकांचं मृत शरीर क्रायोप्रिजर्वेशन प्रक्रिये द्वारे भविष्यासाठी सुरक्षित ठेवले आहेत.

मृत्यू जीवनातील सगळ्यात मोठं सत्य आहे. म्हणजे ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू कधीना कधी अटळ आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. तरीही काही लोक असे असतात ज्यांना अमर व्हायचं असतं. काही मृत लोकांना हजारो वर्षानंतर पुन्हा जिवंत होऊन जगायचं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेत यावर कामही सुरू आहे. इथे यासाठी एक लॅब आहे ज्यात श्रीमंत लोकांचं मृत शरीर क्रायोप्रिजर्वेशन प्रक्रिये द्वारे भविष्यासाठी सुरक्षित ठेवले आहेत.

या लोकांचं मत आहे की, भविष्यात जर काही टेक्निक आली तर मृत शरीरांना पुन्हा जिवंत केलं जाऊ शकेल. अशात तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, ही टेक्निक काय आहे आणि यासाठी किती खर्च लागतो? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.ही आधुनिक लॅब अमेरिकेत आहे. इथे अल्कोर लाईफ एक्सटेंशन फाऊंडेशन नावाची क्रायोनिक्स कंपनी मृतदेहांना भविष्यासाठी सुरक्षित ठेवत आहे. या कंपनीमध्ये सध्या १४०० लोक काम करतात. या कंपनीने एकट्या अमेरिकेत २३० मृतदेहांना संरक्षित केलं आहे. तर जगाबाबत सांगायचं तर या कंपनीने आतापर्यंत ५०० मृतदेह संरक्षित केले आहेत.

कसं केलं जातं हे काम?

ही कंपनी मृतदेहांना क्रायोप्रिजर्वेशन पद्धतीने संरक्षित करते. म्हणजे  मृतदेह क्रायोनिक्स ट्यूबमध्ये -१९६ डिग्रीच्या खालच्या तापमानात ठेवले जातात. तेच जिवंत कोशिका, ऊतक आणि इतर गोष्टी शून्य ते खालच्या तापमानात संरक्षित केल्या जातात.

किती येतो खर्च?

सरासरी एक मृतदेह क्रायोप्रिजर्वेशन करण्यासाठी साधारण १.८ कोटी रूपये खर्च येतो. तेच जर एखाद्या मृत व्यक्तीच्या मेंदुला फ्रीज करायचं असेल तर त्यासाठी जवळपास ६६ लाख रूपये खर्च लागतो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके