शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चमत्कार! आईने आयुष्यभराची कमाई लेकीच्या कॅन्सरवर खर्च केली; नशीब पालटलं, झाली करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 10:47 IST

महिलेचं नाव असून तिने आपल्या आयुष्यभराच्या कमाईचा वापर हा आपल्या मुलीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी केला.

फ्लोरिडाच्या लेकलँडमधील एक महिला अचानक करोडपती झाली आहे. तिने 2 मिलियन डॉलर्सचे (16 कोटी 40 लाखांहून अधिक) लॉटरी जिंकली आहे. गेराल्डिन गिम्बलेट असं या महिलेचं नाव असून तिने आपल्या आयुष्यभराच्या कमाईचा वापर हा आपल्या मुलीच्या कॅन्सरवरील उपचारासाठी केला. न्यूयॉर्क पोस्टनुसार, गिम्बलेटची मुलगी ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होती, परंतु आता गिम्बलेटला आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आहे, कारण मुलीचे उपचार देखील पूर्ण झाले आहेत आणि लॉटरी जिंकून महिलेला भरपूर पैसे देखील मिळाले आहेत.

फ्लोरिडा लॉटरीच्या प्रेस रिलीझनुसार, गिम्बलेटने तिच्या मुलीने कॅन्सरच्या उपचाराची शेवटची फेरी पूर्ण केल्याच्या दुसऱ्या दिवशी लेकलँडमधील गॅस स्टेशनवर 2 मिलियन डॉलर लॉटरीचे तिकीट खरेदी केले. गॅस स्टेशनच्या क्लार्कने सांगितले की, कोणतीही तिकिटे शिल्लक नाहीत, परंतु महिलेने त्यांना पुन्हा शोधण्यास सांगितले कारण तिला क्रॉसवर्ड गेम सर्वात जास्त आवडला. तिला शेवटचे तिकीट मिळाले. गिम्बलेटला लवकरच कळले की, तिने गेमचे सर्वोच्च पारितोषिक जिंकले आहे. 

गिम्बलेटचे संपूर्ण कुटुंब तल्लाहसी येथील फ्लोरिडा लॉटरी मुख्यालयात पोहोचले. फ्लोरिडा लॉटरीने ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. गिम्बलेटच्या मुलीने सांगितले की 'तिच्या आईने आजारी असताना त्याची काळजी घेण्यासाठी तिच्या आयुष्यभराची कमाई संपवली होती. ज्या दिवशी माझ्या आईने हे तिकीट विकत घेतले, त्या दिवशी मी दारावरची बेल वाजवली आणि कॅन्सरवरील उपचार पूर्ण करून हॉस्पिटलमधून बाहेर पडले. मी माझ्या आईसाठी खूप आनंदी आहे.

ट्विटरवर युजर्स यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, या कुटुंबासाठी खूप आनंद झाला आहे, देव पुढे आला आणि आई-वडिलांना आपल्या मुलांना वाचवण्यासाठी मदत केली. दुसऱ्याने लिहिले, अभिनंदन !!!! तुम्ही निःस्वार्थपणे दिलं आणि त्या बदल्यात तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळाले. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देवो. हा एक सुंदर चमत्कार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"