शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या पॅंटच्या चेनवर असलेल्या YKK चा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 15:57 IST

तुम्ही तुमच्या गल्लीतील टेलरकडून शिवलेली पॅंट असो वा नाइकेची ब्रॅंडेड पॅंट असो दोन्हींच्या चेनवर YKK असं लिहिलेलं असतं. तुम्हीही अनेकदा हे पाहिलं असेल.

तुम्ही तुमच्या गल्लीतील टेलरकडून शिवलेली पॅंट असो वा नाइकेची ब्रॅंडेड पॅंट असो दोन्हींच्या चेनवर YKK असं लिहिलेलं असतं. तुम्हीही अनेकदा हे पाहिलं असेल. पण कधी मनात विचार आला का की, असं का लिहिलं आहे? नाही ना? चला आज आम्ही तुम्हाला याचा अर्थ सांगतो. 

काय आहे YKK चा अर्थ?

खरंतर YKK चा पूर्ण अर्थ Yoshida Kōgyō Kabushiki gaisha असा आहे. हे एका जपानी कंपनीचं नाव आहे. ही कंपनी जपानच्या टोकीयोमध्ये Tadao Yoshida नावाच्या व्यापाऱ्यांने उभी केली होती. या व्यक्तीने जानेवारी 1934 मध्ये पॅंटची चेन तयार करणाऱ्या कंपनीची सुरुवात केली होती.

तसे तर पॅंटच्या चेनचा शोध लावणारा अमेरिकन इंजिनिअर Whitcomb L. Judson याचं नाव अनेकांना माहित नाही. पण जगातील पॅंटची चेन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी  YKK करोडों लोकांच्या जीवनाचा भाग बनली आहे. या कंपनीचं नाव 1994 मध्ये बदलून Yoshida Manufacturing Corporation असं करण्यात आलं होतं. पण त्यांच्या प्रॉडक्टवरुन  YKK हे नाव कधीच बदलण्यात आलं नाही. 

अर्ध्या जगासाठी चेनची निमिर्ती करणारी कंपनी

तुम्हाला आश्चर्य वाटेल की, YKK ही चेन तयार करणारी पहिली कंपनी आहे आणि आता या कंपनीचा व्यवसाय भारतासहीत जगातल्या 71 देशांमध्ये पसरला आहे. YKK ही कंपनी जगातल्या अर्ध्या जनतेसाठी चेन तयार करण्याचं काम करते. ही कंपनी भलेही जपानची असेल पण या कंपनीच्या फॅक्टरी युरोप आणि आशियाच्या बॉर्डरवरील मॅकोनमध्ये आहेत. इथे एका दिवसात 50 लाखांपेक्षा जास्त चेन तयार करण्यात येतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय