शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

बाबो! या मुलाच्या हाती मोबाईल देताच आपोआप डिलीट होतोय सर्व डेटा; पाहण्यासाठी तोबा गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 16:35 IST

मुलाच्या हाती मोबाईल जाताच संपूर्ण डेटा डिलीट; पालकांसह नातेवाईक चिंतेत

अलीगढ: मोबाईलचं कोणतंही बटण दाबवल्याशिवाय, फोन फॅक्टरी रिसेट केल्याशिवाय त्यातला संपूर्ण डेटा जाणं शक्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे. पण अलीगढमधल्या एका मुलाच्या हातात मोबाईल गेल्यावर तो संपूर्णपणे रिसेट होतो, त्यातला सगळा डेटा जातो. फोनमधले मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि सगळ्या फाईल्स डिलीट होतात. अनेकांना ही गोष्ट पचनी पडणार नाही. मात्र अलीगढमधला एक मुलगा सध्या याच कारणामुळे चर्चेत आहे.

अलीगढमध्ये वास्तव्यास असलेल्या गौरव अग्रवाल यांचा मुलगा अस्तित्वसोबत घडणाऱ्या घटना चर्चेचा विषय ठरत आहेत. अस्तित्वच्या घराबाहेर लोकांची रांग लागते. अस्तित्वच्या हाती मोबाईल देऊन अनेक जण त्याचा व्हिडीओ चित्रित करतात. अस्तित्वकडे मोबाईल दिल्यावर खरंच त्याच्यातला सगळा डेटा डिलीट होतो का, अशी उत्सुकता अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे अनेक जण थेट चमत्कार पाहायला अस्तित्वच्या घरी येतात.मेन विल बी मेन! जेमिन्सन जिच्याकडे पाहत होता, 'ती' तरुणी नेमकी आहे तरी कोण?

अस्तित्वच्या हातात मोबाईल दिल्यावर तो रिसेट होत असल्यानं अनेकांना धक्का बसला. अस्तित्वच्या वडिलांनी त्याच्या संपूर्ण शरीराची वैद्यकीय चाचणी करून घेतली. मात्र अहवालात काहीच वावगं आढळून आलं नाही. अस्तित्वच्या हाती मोबाईल देताच त्यातील संपूर्ण डेटा गायब होत असल्याचं १२ मे रोजी त्याच्या आई वडिलांच्या सर्वप्रथम लक्षात आलं. 

१२ मे रोजी अस्तित्वनं कुटुंबातल्या एका सदस्याचा मोबाईल घेतला होता. त्या मोबाईलमधला डेटा अचानक गायब झाला. त्यामुळे आई वडील अस्तित्वला ओरडले. डेटा डीलिट झाल्याची तक्रार घेऊन कुटुंबीय मोबाईलच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गेले. मात्र तिथे मोबाईल व्यवस्थित होता. २२ ऑगस्टलादेखील याच घटनेची पुनरावृत्ती झाली. त्यावेळी अस्तित्व त्याच्या आईसोबत ननिहालला गेला होता. रक्षाबंधनादिवशीच त्याच्या आईच्या फोनमधील डेटा गायब झाला.

अस्तित्वच्या जवळ मोबाईल नेल्यानंतर त्यातला डेटा डिलीट होत असल्याचं नंतर कुटुंबाच्या लक्षात आलं. त्यांनी अस्तित्वची वैद्यकीय चाचणी घेतली. मात्र अहवाल अगदी सामान्य होता. डॉक्टरांनी इलेक्ट्रॉनिक बीपी मशीनच्या मदतीनं रक्तदाब तपासण्याचा प्रयत्न केला. पण मशीन एरर दाखवू लागली. त्यामुळे रक्तदाब तपासता आला नाही. अस्तित्वला शरीरात कोणतेही बदल जाणवत नाहीत. अस्तित्वच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना त्याच्या प्रकृतीची चिंता सतावत आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल