शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

नेपोलिअन बोनापार्टने जेथे शेवटचा श्वास घेतला ते विमानतळ आता येणार वापरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 17:09 IST

कित्येक वर्षांपासून रखडलेल्या येथील विमानतळाचे काम पूर्ण झाले असून पहिल्या विमानाने यशस्वी उड्डाणही झाले आहे.

ठळक मुद्देया विमानतळाला अखेर ब्रिटेनच्या प्रशासनाने मान्यता दिल्याने तेथील स्थानिकांनी आणि प्रवाशांनी एकच जल्लोष केला आहे.बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही वर्षभर हे विमानतळ बंद अवस्थेत होतं. अनेक माध्यमांनी या विमानतळाला युजलेस एअपोर्ट म्हणून हिणवलं.

फ्रेंच सम्राट नेपोलिअन बोनापार्ट यांनी ज्याठिकाणी शेवटचा श्वास घेतला ते ठिकाण आता पूर्वीपेक्षा अधिक प्रसिद्ध होणार आहे. कारण कित्येक वर्षांपासून रखडलेल्या येथील विमानतळाचे काम पूर्ण झाले असून पहिल्या विमानाने यशस्वी उड्डाणही झाले आहे. साऊथ अॅटलँडच्या अगदी मध्य भागात असलेल्या आईसलँडवरील सेंट हेलेना या विमानतळाला अखेर ब्रिटेनच्या प्रशासनाने मान्यता दिल्याने तेथील स्थानिकांनी आणि प्रवाशांनी एकच जल्लोष केला आहे.

डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल डेव्हलोपमेंटमार्फत २८५ मिलिअन पौंड खर्च करून हे विमानतळ बांधण्यात आलं होतं. या विमानतळाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही वर्षभर हे विमानतळ बंद अवस्थेत होतं. त्यामुळे ‘निरुपयोगी विमानतळ’ असंही या विमानतळाला म्हटलं जातं. खराब हवेमुळे या विमानतळावरील उड्डाणं बंद करण्यात आली होती.  अखेर विमानतळाला मान्यता मिळाल्यानंतर एअरलिंक एम्ब्रेरर ई-१९०-१०० आय जी. डब्ल्यू एअरक्राफ्ट या विमानाने शनिवारी दुपारी १.१५च्या दरम्यान उडाण घेतलं.

सेंट हेलेना विमानतळाच्या आजूबाजूला ४५०० लोकांची वस्ती आहे. १६५८ पासून येथे ब्रिटिशांची वस्ती आहे. १९३० पासून येथे विमानतळ होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यानंतर बऱ्याच काळाने विमानतळाचे काम हाती घेण्यात आले आणि शेवटी २०१६ साली विमानतळ आणि धावपट्टी पूर्ण झाली. मात्र हवेतील बदलांमुळे या उडाणाची ट्रायल घेणे अशक्य झाल्याने विमानतळाचे उद्घाटन लांबले होते. वर्ष होऊनही या सेवेचा फायदा घेता येत नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक माध्यमांनी या विमानतळाला निरुपयोगी विमानतळ म्हणून हिणवलं. शेवटी ब्रिटन प्रशासनाने विमानतळ खुले करण्याची परवानगी दिली आणि याचे उद्घाटन करण्यात आले.

१०० प्रवाशांची क्षमता असलेल्या विमानात केवळ ६८ प्रवाशांनीच प्रवास केला. हवेतील बदलामुळे विमानातील वजनावर मर्यादा आल्या त्यामुळे फक्त ६८ प्रवाशांनाच येथे मुभा देण्यात आली. सेंट हेलेना विमानतळावर विमानाने पहिल्यांदा उड्डाण घेतल्यावर स्थानिकांच्या आणि प्रवाशांच्या अश्रुंचा बांध फुटला. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले हे विमानतळ अखेर सुरू झाल्याने तेथील स्थानिकांनी एकच कल्लोळ माजवला.

सर्व फोटोज - www.mirror.co.uk

टॅग्स :AirportविमानतळInternationalआंतरराष्ट्रीय