शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एअर इंडियाच्या विमानात उंदराने घातला धुमाकुळ, अन् मग घेण्यात आला असा निर्णय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 19:04 IST

एका उंदरामुळे विमानतळावर उड्डाणाला विलंब होऊ शकतो? पण आता हे प्रत्यक्षात घडलं आहे. फक्त एका उंदरामुळे एअर इंडियाच्या विमानाला उशीर झाला.

काहीवेळा उंदीर त्यांच्या छोट्याशा कृत्यांमुळे मोठं काम खराब करतात. अनेकदा उदरांनी मोठ्या वस्तू किंवा कंपन्यांमध्ये तसंच घरात अगदी महागड्या वस्तू कुरतडून खराब केल्याचं तुम्ही आजवर ऐकलं किंवा पाहिलं असेल. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का, की एका उंदरामुळे विमानतळावर उड्डाणाला विलंब होऊ शकतो? पण आता हे प्रत्यक्षात घडलं आहे. फक्त एका उंदरामुळे एअर इंडियाच्या विमानाला उशीर झाला.

टाटा समूहातर्फे (Tata Group) संचालित एअर इंडियाची श्रीनगर-जम्मू फ्लाईट (Srinagar Jammu Flight) गुरुवारी विमानात उंदीर दिसल्याने सुमारे दोन तास उशिराने निघाली (Air India Flight Delayed Because of Mouse). उंदरामुळे विमानाला उशीर झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

विमान वाहतूक नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या घटनेची चौकशी सुरू केली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. विमानातून उंदीर बाहेर काढल्यानंतरच विमानाने श्रीनगर विमानतळावरून उड्डाण घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं, या घटनेमुळे उड्डाणाला जवळपास दोन तासांचा विलंब झाला.

अधिकारी म्हणाले की फ्लाइट क्रमांक AI822 ची नियोजित उड्डाणाची वेळ दुपारी २.१५ वाजता होती, परंतु ती ४.१० वाजता निघाली. वृत्तसंस्थेनं या प्रकरणी एअर इंडियाचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. टाटा समूहाने २७ जानेवारी रोजी एअर इंडियाचं कामकाज ताब्यात घेतलं आहे. यशस्वी बोली प्रक्रियेनंतर केंद्राने गेल्या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी टाटा समूहाला ही विमानसेवा विकली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके