शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
4
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
5
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
6
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
7
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
8
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
9
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
10
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
11
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
12
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
13
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
14
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
15
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
16
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
17
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
18
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
19
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
20
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

अनोळखी भारतीय पुरुषांसोबत बिनधास्त डेटवर जाते ही ब्रिटिश महिला, वरुन पैसेही घेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 18:31 IST

ब्रिटनमधून भारतात आलेल्या एली सेघेटी (Aili Seghetti) या कन्झ्युमर रिसर्चर आणि इंटिमसी कोचच्या लक्षात आली. भारतात आल्यानंतर जेव्हा ती पहिल्यांदा डेटवर गेली तेव्हा तिला फारसा चांगला अनुभव आला नाही. आपल्या अनुभवाला अनुसरून एलीनं इंटिमसी क्युरेटर (Intimacy Curator) नावाची सर्व्हिस सुरू केली.

भारतामध्ये आजही रिलेशनशिप, इंटिमसी या बाबतीत जाहीरपणे फारसं बोललं जात नाही. इथल्या तरुणाईच्या रिलेशनशिपसंबंधीच्या विचारसरणीमध्येही याचं प्रतिबिंब ठळकपणे दिसतं. भारतीय मुला-मुलींना डेटिंग (Dating) करण्यात आणि संवाद साधताना अडचणी येतात. व्यक्तीशी जवळीक वाढवण्यासाठी कोणाशी कसा संपर्क साधावा, कसं बोलावं याचं जनरल नॉलेजही अनेकांकडे नाही. ही गोष्ट 15 वर्षांपूर्वी ब्रिटनमधून भारतात आलेल्या एली सेघेटी (Aili Seghetti) या कन्झ्युमर रिसर्चर आणि इंटिमसी कोचच्या लक्षात आली. भारतात आल्यानंतर जेव्हा ती पहिल्यांदा डेटवर गेली तेव्हा तिला फारसा चांगला अनुभव आला नाही. आपल्या अनुभवाला अनुसरून एलीनं इंटिमसी क्युरेटर (Intimacy Curator) नावाची सर्व्हिस सुरू केली.

एलीनं भारतामध्ये 'इंटिमसी क्युरेटर' नावानं डेटिंग, रिलेशनशिप, इंटिमसी कोचिंग सर्व्हिस सुरू केली आहे. या सर्व्हिसमध्ये ती क्लायंट्सना डेटिंगशी संबंधित अनुभव शेअर करते. 'डेटिंग सरोगेट' (Dating Surrogate) या ऑप्शनमध्ये एली क्लायंट्सना त्यांच्या डेटशी संबंधित लाइव्ह फीडबॅकही देते. बॉडी लँग्वेज (Body Language), आय कॉन्टॅक्ट, ग्रूमिंग, स्टायलिंग याबाबत ती सल्ले देते. त्याचबरोबर डेटदरम्यान कोणत्या विषयांवर चर्चा व्हायला हवी, हेही ती सांगते. स्वतःच्या खराब डेटिंग अनुभवानंतरच डेटिंग शिकवण्याची कल्पना तिच्या मनात आली होती. त्यासाठी ती स्वतःच अनेक पुरुषांसोबत डेटवर जाते. तिनं 'डेटिंग सरोगसी' सर्व्हिस देण्यास सुरुवात केली. तिच्याकडे सध्या यासाठी अनेक ट्रेनर्सही आहेत. हे ट्रेनर्स क्लायंट्सना डेटिंगसाठी तयार करतात.

एलीने यापूर्वी बंबल (Bumble), टिंडर (Tinder) आणि फेसबुकसारख्या (Facebook) अनेक कंपन्यांसाठी कन्झ्युमर रिसर्चचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर तिनं सेक्स आणि इंटिमसी कोच (Intimacy Coach) म्हणूनही अनेकांना प्रशिक्षण दिलं आहे. तिच्या मते, कल्चरल शिफ्टमुळे भारतात डेटिंगचा ट्रेंड (Dating Trend) वेगळा आहे. 'द व्हाइस'शी बोलताना एली म्हणाली, 'डेटिंग करताना पुरुष आणि महिलांना कसं बोलावं हे लवकर समजत नाही. याची अनेक कारणं आहेत. आता पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक कमावत असल्यानं त्या उघडपणे सेक्सबद्दल (Sex) बोलतात. आता अरेंज मॅरेजऐवजी (Arrange Marriage) लव्ह मॅरेज (Love Marriage) करण्यालाही तरुण प्राधान्य देत आहेत.'

एलीनं सांगितलं, की क्लायंटसोबतचं तिचं सेशन काउन्सिलिंगपासून सुरू होतं. या माध्यमातून ती त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करते. क्लायंटला कशाची भीती वाटते किंवा त्याला काय अपेक्षित आहे. ती व्यक्ती कॅज्युअल डेटच्या (Casual Date) शोधात आहे की लाँग टर्म पार्टनरच्या (Long Term Partner) शोधात आहे, हेदेखील समजून घेण्याचा प्रयत्न एली करते. यानंतर ती क्लायंटची पर्सनॅलिटी टेस्ट करते.

या माहितीनुसार ती डेटिंग अ‍ॅपवर प्रोफाइल तयार करते किंवा त्यासाठी गाइड करते. यानंतर, एली क्लायंटच्या पसंतीनुसार डेट डिझाइन करते. ती म्हणते, की एखाद्याला वाचनाची आवड असेल तर ती त्याच्यासाठी पुस्तकांच्या दुकानात किंवा कॉफी शॉपमध्ये डेट प्लॅन करून देते. एखाद्याला बाहेर डेटवर जायचं असेल तर ती त्याला लोणावळ्यासारख्या जवळच्या हिल स्टेशनवर (Hill Station) घेऊन जाते. क्लायंटला एक आठवडा ते तीन महिन्यांपर्यंतच्या काळात डेटिंग सरोगसीचा एक्सपीरियन्स घेता येतो. याचे काही क्रॅश कोर्सदेखील उपलब्ध आहेत. क्लायंटच्या प्री-डेट काउन्सिलिंगसाठी (Pre-date counseling) तीन हजार रुपये आणि दोन तासांच्या डेटसाठी पाच हजार रुपये द्यावे लागतात. त्याचबरोबर सरोगेटच्या सुरक्षेसाठी एक वकीलही त्याच्यासोबत असतो. जेणेकरून काही कायदेशीर अडचण आल्यास तो हस्तक्षेप करू शकेल. आउटस्टेशन डेटसाठी खासगी सुरक्षा रक्षक आणि एलीच्या टीममधल्या इतर व्यक्तीही उपस्थित असतात.

एलीनं सांगितलं, की आम्ही ज्या क्लायंटना रोमान्स करायला शिकवलं तेच आमच्या प्रेमात पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत; मात्र आम्ही कधीच पर्सनल इमोशन्स बिझनेसमध्ये आणत नाही. एलीनं हेदेखील स्पष्ट केलं, की तिला अनेकदा डेटवर असतानाच नकाराचाही सामना करावा लागलेला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके