शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

41 वर्षानंतर मिळाला खऱ्या आईचा पत्ता, भेटायला गेला तर बाथरूममध्ये दिसला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 13:17 IST

एका व्यक्तीला बालपणीच दत्तक दिलं होतं. पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा तो आपल्या खऱ्या आईला शोधण्यास निघाला.

अनेकदा व्यक्तीच्या जीवनात अशा घटना घडतात ज्यावर त्यांची ईच्छा असूनही ते नियंत्रण ठेवू शकत नाहीत. एका मुलासाठी त्याची आई जगात सगळ्यात महत्वाची असते. जर कुणाला समजलं की, ज्या महिलेला तो आई समजत होता तिने त्याला जन्मच दिला नाही तर याने कुणालाही धक्का बसेल. लंडनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला बालपणीच दत्तक दिलं होतं. पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा तो आपल्या खऱ्या आईला शोधण्यास निघाला.

पण दुर्दैव असं की, जेव्हा 41 वर्षानंतर त्याने त्याच्या खऱ्या आईला शोधलं तेव्हा त्याला तिचा मृतदेह दिसला. खऱ्या आईला भेटण्यासाठी पोहोचलेल्या व्यक्तीला बाथरूममध्ये तिचा मृतदेह आढळला. ही घटना लंडनमध्ये राहणाऱ्या स्टीवन स्मिथसोबत घडली. स्टीवनचा जन्म होताच त्याला त्याच्या आईने दुसऱ्या कपलला दत्तक दिलं होतं.

स्टीवनचा जन्म झाला तेव्हा त्याचे वडील तुरूंगात शिक्षा भोगत होते. याच कारणाने स्टीवनच्या आईने त्याच्या चांगल्या भविष्यासाठी एका कपलला दत्तक दिलं होतं. जेव्हा स्टीवनला हे समजलं की, तो दत्तक आहे तर तो त्याच्या खऱ्या आई-वडिलांचा शोध घ्यायला निघाला. त्याला त्याची खरी ओळख हवी होती. स्टीवनला दत्तक घेणारं कपलही पाच वर्षानंतर वेगळं झालं होतं. 

आई पत्ता लागला, पण...

स्टीवनने त्याची ही कहाणी लोकांसोबत शेअर केली. त्याने सांगितलं की, 41 वर्षानंतर त्याला त्याच्या खऱ्या आईचा पत्ता लागला. पण जेव्हा तिला भेटण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याच्या आईचा मृतदेह बाथरूममध्ये पडून होता. म्हणजे तो त्याच्या आईला भेटूच शकला नाही.

आता स्टीवन आपल्या बायोलॉजिकल वडिलांच्या शोधात आहे. स्टीवननुसार, त्याच्या वडिलांचं नाव frank आहे आणि ते अजूनही जिवंत आहेत. आता स्वत: मुलांचा पिता असलेला स्टीवन आपल्या वडिलांच्या शोधात आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल