ऑनलाइन टीम
कोट्टयम (केरळ), दि. २२- केरळमधील कोट्टयम येथे एका मद्यपी तरुणाने त्याच्याच आईवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पिडीत महिलेने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी तातडीने तरुणाला अटक केली आहे.
कोट्टयम जिल्ह्यातील पाला गावात राहणारा २५ वर्षीय तरुणाला दारुचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून त्याने मद्यधूंद अवस्थेत आईवरच लैंगिक अत्याचार केले. अखेरीस पिडीत महिलेने पोलिसांकडे मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी संबंधित नराधम तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.