शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेंडच्या कपड्यात सापडली अशी वस्तू जी पाहुन महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 14:48 IST

एका जोडीदाराने केलेली फसवणूक (Cheating in Love) दुसऱ्याला कळते तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. अलीकडेच, एका महिलेसोबत असंच घडलं. यात तिला अतिशय अजब पद्धतीने हे समजलं की तिचा प्रियकर तिची फसवणूक करत आहे (Affair of Boyfriend Exposed by Fake Eyelashes).

अनेकदा जेव्हा नात्यातील प्रेम आणि विश्वास संपतो, तेव्हा लोक आपल्या जोडीदाराला धोका द्यायला लागतात. अशा स्थितीत नातं लवकर संपुष्टात येतं. पण जेव्हा एका जोडीदाराने केलेली फसवणूक (Cheating in Love) दुसऱ्याला कळते तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. अलीकडेच, एका महिलेसोबत असंच घडलं. यात तिला अतिशय अजब पद्धतीने हे समजलं की तिचा प्रियकर तिची फसवणूक करत आहे (Affair of Boyfriend Exposed by Fake Eyelashes).

मिरर वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, टिकटॉकर @mrs__divinity ने अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलेनं सांगितलं की, तिला कसं कळलं की तिचा प्रियकर तिची फसवणूक करत आहे. महिलेनं आपल्या हातामध्ये मुलींकडून वापरल्या जाणाऱ्या बनावट पापण्या घेतलेल्या आहेत.

व्हिडिओमध्ये ती महिला म्हणते, की तिचा प्रियकर नक्कीच तिची फसवणूक करत आहे कारण ती कपडे धुत असताना तिला त्याच्या कपड्यांमध्ये मुलींच्या नकली पापण्या आढळल्या. या पापण्या तिच्या नसल्याचंही तिने स्पष्ट केलं. या महिलेनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यापासून लोक तिला समजावून सांगत आहेत की या पापण्या दुसऱ्या महिलेच्या असण्याचीच शक्यता जास्त आहे. तिने कदाचित मुद्दाम त्याच्या कपड्यांमध्ये या पापण्या ठेवल्या असतील, जेणेकरून तुला त्याच्यावर संशय यावा आणि तू त्याला सोडून द्यावं.

एका युजरनं म्हटलं की त्या मुलीने तिच्या पापण्या फक्त तुला त्या दिसाव्या यासाठीच ठेवल्या असतील. तर दुसऱ्या एकाने लिहिलं, की या पापण्या त्याच्या कपड्यांवर सोडण्यामागचं कारण म्हणजे तिला एक संकेत तुला द्यायचा होता. या महिलेने पुढे काय पाऊल उचललं हे माहित नाही, परंतु ही एकमेव घटना नाही जेव्हा महिलांना त्यांच्या प्रियकराच्या अफेअरबद्दल अशा पद्धतीने समजलं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके