या जाहिरातीवर जगभरातून होतेय टीका, Video पाहिला तर तुम्‍हीही चिडाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2016 07:52 AM2016-05-29T07:52:17+5:302016-05-29T07:52:17+5:30

चीनमध्‍ये तयार केलेल्‍या एका जाहिरातीवर सध्‍या जगभरातून टीका होत आहे. या जाहिरातीचा व्‍हिडियोही सध्या सोशल मीडियावर व्‍हायलर होत आहे. एका चीनी डिटर्जंट पावडरची ही ४८ सेकेंदांची जाहिरात आहे.

This ad is happening worldwide, criticizing the video, if you watch the video, then you too | या जाहिरातीवर जगभरातून होतेय टीका, Video पाहिला तर तुम्‍हीही चिडाल

या जाहिरातीवर जगभरातून होतेय टीका, Video पाहिला तर तुम्‍हीही चिडाल

Next
>ऑनलाइन लोकमत
पेइचिंग, दि. २९ :  चीनमध्‍ये तयार केलेल्‍या एका जाहिरातीवर सध्‍या जगभरातून टीका होत आहे. या जाहिरातीचा व्‍हिडियोही सध्या सोशल मीडियावर व्‍हायलर होत आहे. एका चीनी डिटर्जंट पावडरची ही ४८ सेकेंदांची जाहिरात आहे. यामध्ये काळ्या गोऱ्यारंगावरुन वाद निर्माण झालेली आहे. जगभरातून या जाहीरातीवर टीका होत असताना चीनमध्ये मात्र या जाहीरातीचे स्वगत करण्यात आले आहे. चीनी लोकांना ही जाहीरात विशेष आवडल्याचे चित्र आहे. 
 
काय आहे जाहिरातीमध्‍ये.. 
- वादात सापडलेली जाहिरात एका चीनी डिटर्जंट पावडरची आहे. 
- या जाहिरातीत एका काळ्या रंगाच्या व्यक्तीला वॉशिंग मशीनमध्ये टाकले जाते. 
- जेव्हा तो मशीनमधून बाहेर निघतो तेव्हा त्याचा रंग गोरा झालेला असतो.
- वर्णभेदावरुन या जाहिरातीवर टीका केली जात आहे. 
- मात्र चीनमध्ये या जाहिरातीचे स्वागत करण्यात आले आहे. 
- किऑबी नावाच्या डिटर्जंट उत्पादनाची ही जाहिरात आहे.
 
 

Web Title: This ad is happening worldwide, criticizing the video, if you watch the video, then you too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.