शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

ना पंडित, ना फेरे, ना विधी... राज्यघटनेच्या साक्षीने पार पडले अनोखे लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 10:35 IST

१२ वर्षांच्या अफेअरनंतर अडकले लग्नबंधनात

लोकमत न्यूज नेटवर्क

बैतूल : भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने मध्य प्रदेशातील एक वकील आणि शिक्षक यांनी अनोखा विवाह केला. राज्यघटनेची प्रत हातात घेऊन त्याची प्रस्तावना वाचून दर्शन आणि राजश्री यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली. बैतूलच्या कोठीबाजार येथील वकील दर्शन बुंदेला आणि इटारसी रोड येथील रहिवासी राजश्री अहिरे यांचा रविवारी सायंकाळी बडोरा येथील मंगलकार्यालयात विवाह पार पडला. पंडित नाही, फेरे नाही की, इतर कोणतेही विधीही या लग्नात पार पडले नाहीत. दोघांनी प्रथम नोंदणीकृत विवाह केला.

निमंत्रण पत्रिकेवरही घटनेचा उल्लेख

“कलम २१ नुसार, ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या अधिकाराखाली लग्न करत आहेत. तुम्हीही घटनेच्या कलम १९ (आय) (बी) नुसार शांततेने एकत्र येण्याचा अधिकार वापरून लग्नाला या आणि त्यांना आशीर्वाद द्या”, असे लग्नपत्रिकेवर छापले होते.

१२ वर्षांच्या अफेअरनंतर लग्न

- दर्शन बैतूलच्या जिल्हा न्यायालयात वकील आहे, तर राजश्री हरदा जिल्ह्यातील एक्सलन्स स्कूलमध्ये उच्च माध्यमिक वर्गातील शिक्षिका आहे. दर्शन आणि राजश्रीची मैत्री १२ वर्षांपूर्वी कॉलेजमध्येच झाली. - तेव्हापासून दोघांनी सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. १२ वर्षांनंतर अखेर दोघे विवाहबंधनात अडकले. आंतरजातीय प्रेमविवाह दोघांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने झाला.

जातीच्या आधारावर भेदभाव

“देशात जातीची मुळे खोलवर पसरली आहेत. घटनेचे कलम २१ जे आम्हाला निवडण्याचा अधिकार देते. याच अधिकाराचा वापर करत आम्ही ही प्रस्तावना वाचून लग्न केले आणि एकमेकांचे जीवनसाथी बनलो”, असे दाम्पत्याने म्हटले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके