शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक असं ठिकाण जिथे आपोआप 'चालतात' दगड, वैज्ञानिकही झाले हैराण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 16:04 IST

Death Valley : या चालणाऱ्या दगडांवर अनेक वर्ष रिसर्च केले गेले. तरीही त्यांचं रहस्य काही उलगडण्यात कुणाला यश मिळालं नाही. 

Death Valley : जर कुणी तुम्हाला म्हटलं की, दगड आपोआप चालतात. तर नक्कीच तुम्ही समोरच्या व्यक्तीला वेड्यात काढाल. कारण हे सगळ्यांनाच माहीत आहे की, दगड निर्जिव असतात. पण एक ठिकाण असं आहे जिथे खरंच दगड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.

हे ठिकाण अमेरिकेत आहेत. इथे दगड चालतात. या चालणाऱ्या दगडांवर अनेक वर्ष रिसर्च केले गेले. तरीही त्यांचं रहस्य काही उलगडण्यात कुणाला यश मिळालं नाही. कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅली नॅशनल पार्कमध्ये 'रेस ट्रॅक प्लाया' नावाचा एक कोरडा तलाव आहे. हा तलाव २.५ मैल उत्तर ते दक्षिण आणि १.२५ मैल पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरला आहे. यात पूर्ण जमीन सपाट आहे.

या ठिकाणावरील एक अजब बाब म्हणजे या कोरड्या तलावात असलेले दगड आपोआप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाण सरकतात. त्यामुळेच या ठिकाणाल डेथ व्हॅली असं नाव देण्यात आलं कारण इथे निर्जिव गोष्टही चालते. महत्वाची बाब म्हणजे हे दगड जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाण सरकतात तेव्हा एक खूणही सोडतात. 

1972 साली या रहस्याचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न केले गेले होते. त्यासाठी वैज्ञानिकांचं एक विशेष पथकही इथं आलं होतं. या दगडांवर त्यांनी तब्बल सात वर्ष संशोधन केलं. त्याच काळात 317 किलोग्रॅमच्या एका दगडाचा विशेष अभ्यास करण्यात आला. तेव्हा तो दगड अजिबात हलला नव्हता. 

मात्र त्यानंतर काही वर्षांनी जेव्हा वैज्ञानिकांनी पुन्हा या दगडाचा तिथे जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा दगड मूळ जागेवरुन एक किलोमीटर लांब अंतरावर सापडला. साहजिकच शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले. मात्र तरीही हे दगड मूळ जागेवरुन कसे हलतात किंवा घसरतात याबद्दल काहीही माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे हलणाऱ्या दगडांच्या या जागेचं रहस्य कायम आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स