शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

दुर्मिळ आजारामुळे दाढी-मिशा आल्या; तिने वाढवल्या अन् गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 17:35 IST

लोकांनी चिडवले, टोमणे मारले; तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, जाणून घ्या महिलेची कहाणी...

74 वर्षीय महिला पुन्हा एकदा तिच्या दाढी आणि मिशांमुळे चर्चेत आली आहे. जगात कोणत्याच महिलेला या महिलेएवढी दाढी नाही. दाढी आणि मिशामुळे या महिलेचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. हायपरट्रिकोसिस सिंड्रोममुळे महिलेच्या चेहऱ्यावर केसांची वाढ झाली. सुरुवातीला महिला कंटाळली होती, पण नंतर तिला सवय झाली आणि हळुहळून तिने दाढी-मिशा वाढवणे सुरू केले. एका मुलाखतीत या महिलेने तिची कहाणी सांगितली.

विवियन व्हीलर असे या 74 वर्षीय महिलेचे नाव आहे. तीन मुलांची आई विवियन अमेरिकेतील ओक्लाहोमा येथील रहिवासी आहे. एप्रिल 2011 मध्ये तिने 'सर्वात लांब दाढी असलेली महिला' असा मान मिळवला आणि त्यासाठी तिचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. तिची दाढी 25 सेमी लांब आहे. हायपरट्रिकोसिस व्यतिरिक्त, विवियन हर्माफ्रोडिटिझम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या आजारात एक व्यक्ती एकाच वेळी नर आणि मादी दोन्ही प्रजनन पेशी तयार करते.

लोकांचे टोमणे ऐकले, मग हा निर्णय घेतलाविवियन म्हणते की, तिच्या दाढी आणि मिशांमुळे तो जगापासून बहिष्कृत झाला होता. ना तिचे मित्र बनत ना कोणी तिच्यासोबत खेळायया येत. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. ती मोठी झाल्यावर सर्कसमध्ये सामील झाली आणि तिथे काम करू लागली. तिथून त्यांना आयुष्यात पुढे जाण्याचे बळ मिळाले. 1990 पासून तिने मिशा आणि दाढी कापण्याचे बंद केले. विवियन म्हणते की, मी दाढीशिवाय काहीच नाही. कोणी काहीही म्हणले तरी, मी माझ्या मार्गावर चालत राहीन. 

हायपरट्रिकोसिस सिंड्रोम म्हणजे काय?एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील केसांच्या वाढीच्या असामान्य स्थितीला हायपरट्रिकोसिस सिंड्रोम म्हणतात. हा दोन प्रकारचा असतो. एका स्थितीत पीडितेच्या शरीराच्या काही भागांवर केस येतात. तर दुस-या स्थितीत एका ठराविक भागावर केस येतात. याला वेअरवूल्फ सिंड्रोम असेही म्हणतात. हा सिंड्रोम पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो. परंतु हा एक अत्यंत दुर्मिळ सिंड्रोम आहे जो दशलक्ष लोकांपैकी फक्त एकामध्ये होतो.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स