शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्यार का बंधन! 67 वर्षांची रामकली 28 वर्षीय भोलूच्या प्रेमात; लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी गेली कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 10:47 IST

67 वर्षीय रामकली 39 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. लिव्ह-इन रिलेशनची प्रकरणे सामान्यतः मोठ्या शहरांमध्ये दिसतात, परंतु ग्वाल्हेरमध्येही लिव्ह-इनचा ट्रेंड वाढत आहे.

प्रेमाला वयाचं बंधन नसतं. अनेकदा वयाचा फरक प्रेमाच्य़ा आड येत नाही. अशाच एका अनोख्या प्रेमाची घटना आता समोर आली आहे. जिथे 67 वर्षीय रामकली 28 वर्षीय भोलूच्या प्रेमात पडली आणि विशेष म्हणजे ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले. एक वर्षापूर्वी, दोघांनीही लिव्ह-इन रिलेशनशिपचे कागदपत्र देखील केले आहेत. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

67 वर्षीय रामकली 39 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली. लिव्ह-इन रिलेशनची प्रकरणे सामान्यतः मोठ्या शहरांमध्ये दिसतात, परंतु ग्वाल्हेरमध्येही लिव्ह-इनचा ट्रेंड वाढत आहे. चंबळमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपची एक अनोखी घटना समोर आली आहे, जिथे 67 वर्षीय रामकलीने 28 वर्षीय भोलूसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपशी संबंधित कागदपत्रे नोटरी केली आहेत. मुरैना जिल्ह्यातील कैलारस येथे राहणारी 67 वर्षीय रामकली ही 28 वर्षीय भोलूच्या प्रेमात पडली. दोघे प्रेमात आहेत पण लग्न करायचे नाही.

दोघांनी लिव्ह-इन रिलेशन निवडले, त्यामुळे रामकली आणि भोलू ग्वाल्हेरच्या जिल्हा न्यायालयात पोहोचले आणि दोघांनी लिव्ह-इन रिलेशन नोटरी केले. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असून एकत्र राहायचे आहे, दोघेही प्रौढ आहेत, लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहताना भविष्यात वाद होऊ नयेत, यासाठी नोटरी घेण्यासाठी आल्याचे रामकली आणि भोलू सांगतात.

ग्वाल्हेरचे वकील दिलीप अवस्थी यांनी सांगितले की, आजकाल जेव्हा स्त्री-पुरुष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात, तेव्हा त्यांच्यात कधी-कधी मतभेद होतात. जेव्हा लिव्ह-इन जोडप्यांची जात वेगळी असते किंवा वयात फरक असतो, तेव्हा अशा लिव्ह-इन जोडप्यांमध्ये अधिक वाद होतात. त्याच वेळी, अनेक जोडप्यांमध्ये एकमेकांच्या नोकरीबद्दल अहंकाराचा संघर्ष सुरू होतो, नंतर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचते. यामुळेच वाद टाळण्यासाठी अशी जोडपी लिव्ह इन रिलेशनची नोटरी तयार करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके