शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डेटींग अ‍ॅप, मेट्रिमोनिअल साईटही नव्हे, या आजोबांनी जोडीदार शोधण्यासाठी निवडला भलताच मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 17:37 IST

६६ वर्षांचे हे आजोबा दोन लग्न आणि पाच मुलं झाल्यानंतरही आपल्याला परफेक्ट लाइफ पार्टनर मिळाली नाही असं सांगतात. या वयातही त्यांनी आपल्यासाठी योग्य जोडीदारासाठी शोध सुरू केला आहे आणि त्यासाठी त्यांनी हटके मार्ग निवडला आहे.

आपल्या आयुष्यात आपला एक चांगला जोडीदार (Find life partner) मिळावा असं आपल्याला वाटतं. त्यासाठी आपण आपल्या ओळखीच्या, जवळच्या व्यक्तीमध्ये असा जोडीदार शोधतो किंवा डेटिंग अ‍ॅपची मदत घेतो. लग्न करायचं असेल तर मॅट्रिमोनिअल वेबसाईट किंवा जाहिराती देतो. पण एक व्यक्ती तर याच्याही पुढे गेला. त्याने परफेक्ट लाइफ पार्टनर हवा यासाठी चक्क रस्त्यावर होर्डिंग लावलं आहे. आश्चर्य म्हणजे ही व्यक्ती साठीपार आहे, जिची दोन लग्न झाली आहेत आणि पाच मुलंही आहेत.

६६ वर्षांचे हे आजोबा दोन लग्न आणि पाच मुलं झाल्यानंतरही आपल्याला परफेक्ट लाइफ पार्टनर मिळाली नाही असं सांगतात. या वयातही त्यांनी आपल्यासाठी योग्य जोडीदारासाठी शोध सुरू केला आहे आणि त्यासाठी त्यांनी हटके मार्ग निवडला आहे.

अमेरिकेच्या  (United States News) टेक्ससमध्ये (Texas) राहणारे 66 वर्षांचे जिम बेझ (Jim Bays). त्यांची दोन लग्न झाली, त्यानंतर दोन्ही पत्नींसोबत घटस्फोटही झाला. आता त्यांना पाच मुलं आहेत. पण आता ते परफेक्ट लाइफ पार्टनरच्या शोधत आहे. जिम अशा महिलेच्या शोधात आहे, जी फक्त त्यांच्यासाठी बनलेली असावी. साठी पार झाल्यानंतरही त्यांच्या आयुष्यात अशी महिला आली नाही. सुरुवातीला त्यांनी डेटिंग अॅपवर पार्टनरस शोधायला सुरुवात केली. पण हवं तसं प्रोफाईल मिळालं नाही.

यानंतर त्यांनी त्यांनी डेटिंग अ‍ॅप, मॅट्रिमोनिअल अ‍ॅड किंवा वेबसाईटची मदत घेतली नाही तर थेट रस्त्यावरच बोर्ड लावलं. टेक्ससच्या हायवेवर त्यांनी एक मोठा बिलबोर्ड लावला. होर्डिंगवर त्यांनी आपल्याला नेमकी कशी जोडीदार हवी ते सांगितलं आहे. सोबत आपला फोटो आणि फोन नंबरही दिला आहे. ज्यावर वॉईसमेलही पाठवता येईल. होर्डिंगवर त्यांनी लिहिलं आहे, मला एका चांगल्या महिलेचा शोध आहे. तिचं वय ५० ते ५५ वर्षे असावं. जी माझ्यासोबत फिरेल, माझ्याशी बोलेल आणि चांगल्या कामात माझी साथ देईल.

Austonia नावाच्या चॅनेलशी बोलताना त्यांनी सांगितलं की, जेव्हा तुमचं वय कमी असतं, तेव्हा साथीदार मिळणं सोपं असतं. पण या वयात ते कठीण आहे. त्यांना काही लोकांचे वॉईसमेलसुद्धा आले पण आतापर्यंत योग्य महिला त्यांना भेटली नाही.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके