शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ऐकावं ते नवलच! 13 वर्षांपासून चोरतोय फक्त महिलांचेच रेनकोट; कारण ऐकून बसेल मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 11:33 IST

गेल्या 13 वर्षांपासून योशिदा महिलांचे रेनकोट चोरत होता आणि याच गुन्ह्यासाठी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

जपानमधल्या एका चोराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. याने एक अशी वस्तू चोरली आहे ज्याचा तुम्ही विचारही कधी केला नसेल. जपानमधली या व्यक्तीच्या मनात एकेदिवशी पुरुषांचे नव्हे तर महिलांचे रेनकोट जमवण्याचा विचार आला. यासाठी त्याने शोधलेली पद्धत खूपच थक्क करणारी आहे. ही व्यक्ती महिलांचे रेनकोट चोरत होती. पोलीस 10 वर्षांपासून या व्यक्तीचा शोध घेत होते. अखेरीस या व्यक्तीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

`ऑडिटी सेंट्रल` या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, 51 वर्षांच्या योशिदो योदा याला जपानमधील ओसाकामधून पोलिसांनी अटक केली. गेल्या 13 वर्षांपासून योशिदा महिलांचे रेनकोट चोरत होता आणि याच गुन्ह्यासाठी त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो लपून गुन्हे करत असे आणि 10 वर्षांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अटक होईपर्यंत पोलिसांनी त्याला `रेनकोट मॅन` असं नाव दिलं होतं.

2009 पासून करत होता रेनकोटची चोरी

रिपोर्टनुसार, योशिदो घरोघरी वृत्तपत्र वाटपाचं काम करत होता. एक दिवस अचानक त्याला कप्पा जमा करण्याचा विचार सुचला. कप्पा हा जपानी कापडाचा एक प्रकार आहे जे प्लॅस्टिकपासून तयार केलेलं असतं आणि कपडे ओले होऊ नये यासाठी ते कपड्यांवर परिधान केलं जातं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योशिदो 2009 पासून रेनकोटची चोरी करत होता. घराची झडती घेतली तेव्हा घरातून 360 रेनकोट पोलिसांनी जप्त केले. यापैकी सुमारे 320 रेनकोट हे मागच्या 10 वर्षांत चोरी केलेले होते.

पोलिसांनी योशिदोच्या चोरीची पद्धतही स्पष्ट केली. पोलिसांनी सांगितलं की, योशिदो अनेकदा सायकल चालवणाऱ्या महिलांचा पाठलाग करत किंवा अशी सायकल किंवा बाईक शोधायचा जी महिला वापरतात. मग त्यात पडलेल्या वस्तूंवर नजर ठेवायचा. त्यात त्याला रेनकोट दिसला तर तो चोरी करायचा. जेव्हा पोलिसांनी त्याला रेनकोट का चोरायचा असा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला, ``जसे इतर पुरुष महिलांना अंडरगारमेंटमध्ये पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात, त्याचप्रमाणे मला रेनकोट परिधान केलेल्या महिलांना पाहणं आवडतं म्हणून मी त्यांचे रेनकोट चोरत असे.`` पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार योशिदोने आतापर्यंत सहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रेनकोट चोरले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेJapanजपान