शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

36 इंचाचा वर आणि 34 इंचाची वधू; अनोखे लग्न पाहण्यासाठी निमंत्रणाशिवाय जमले हजारो लोक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 15:50 IST

बिहारच्या भागलपूरमधील एका लग्नाची पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली आहे. या दाम्पत्याला आशिर्वाद देण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते.

भागलपूर: असे म्हटले जाते की, जोड्या स्वर्गात देव तयार करतो. बिहारमधील भागलपूरमध्ये अशाच एका जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या अनोख्या लग्नाला हजारो पाहुणे निमंत्रणाशिवाय आले. एवढेच नाही तर लोकांनी वधू-वरांसोबत सेल्फी काढले आणि दोघांना यशस्वी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. हे लग्न खूप खास होते कारण वराची उंची 36 इंच आणि वधूची 34 इंच आहे. संपूर्ण परिसरात लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

24 वर्षीय वधू ममता ही नवगचिया येथील किशोरी मंडस उर्फ ​​गुजो मंडलची मुलगी आहे. मसारू येथील बिंदेश्वरी मंडलचा मुलगा मुन्ना भारती हा 26 वर्षांचा आहे. वधू-वर हे भागलपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. खरं तर हे लग्न खूप खास ठरले कारण 36 इंची मुन्नाला त्याचा जीवनसाथी मिळाला. 34 इंची ममतासोबत मुन्नाची जोडी आकर्षक दिसत होती. यावेळी उपस्थित प्रत्येकजण या जोडीला आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता.

लग्नाच्या वेळी डीजेवर 'रब ने बना दी जोडी' हे गाणे वाजत होते आणि लोक त्यावर जोरदार नाचत होते. या लग्नाला हजारो स्थानिक लोक पोहोचले होते. जयमालाच्या वेळी लोकांची स्टेजपर्यंत जाण्यासाठी चढाओढ सुरू होती. हा विवाह संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. 

टॅग्स :BiharबिहारJara hatkeजरा हटके