शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोष्ट छोटी डोंगराएवढी: ३० वर्षे डोंगर खणून तयार केला ३ कि.मी.चा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 08:22 IST

Jara Hatke News: बेहरा यांनी ३० वर्षे कठोर परिश्रम करून पहाड़ कापून तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला. एक वेळ अशी होती की, राज्याचे मंत्री आणि इतर सगळे तेथे रस्ता तयार होऊ शकत नाही, असे म्हणत होते; परंतु हरिहर बेहरा यांच्या जिद्दीने इतिहास निर्माण केला.

भुवनेश्वर (ओदिशा) : सरकारी अधिकारी, आमदार, मंत्री यांनी नकार दिल्यानंतर जिद्द आणि अथक परिश्रम केले तर ओदिशातील आदिवासी शेतकरी हरिहर बेहरा आणि त्यांच्या भावाने घडवले तसे परिवर्तन साकार होते. बेहरा यांनी ३० वर्षे कठोर परिश्रम करून पहाड़ कापून तीन किलोमीटरचा रस्ता तयार केला. एक वेळ अशी होती की, राज्याचे मंत्री आणि इतर सगळे तेथे रस्ता तयार होऊ शकत नाही, असे म्हणत होते; परंतु हरिहर बेहरा यांच्या जिद्दीने इतिहास निर्माण केला.हरिहर बेहरा भुवनेश्वरपासून ८५ किलोमीटर दूर नयागढ जिल्ह्यातील तुलुबी गावात राहतात. हे गाव बरेच मागासलेले आहे. त्याच्या जवळपास कोणताही रस्ता नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. लोक ये-जा करण्यासाठी जंगलातील रस्ता वापरत. हा रस्ता सुरक्षित नाही म्हणून हरिहर बेहरा यांनी रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला. जंगलातून शहरात किंवा बाज़ारात जाणे कठीण झाले होते. पहाडी आणि जंगली भागांमुळे जंगली प्राणी आणि विषारी सापांचा धोका असायचा. लोकांना त्यालाही तोंड द्यावे लागायचे. या पार्श्वभूमीवर हरिहर बेहरा यांनी रस्ता केला जावा म्हणून आधी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी अशक्य म्हणून हात वर केले. राज्याच्या  मंत्र्यानेही नकार दिला. सगळीकडूनच नकार मिळाल्यावर हरिहर बेहरा यांच्या पाठीशी त्यांचा भाऊ उभा ठाकला. दोघांनी मिळून मोठमोठे खडक तोडले. 

आमदाराकडून नकार  स्थानिक आमदाराकडे या पहाडातून रस्त्याची मागणी केल्यावर ते म्हणाले की, हा रस्ता येथे कधीच होऊ शकणार नाही. हे ऐकल्यापासून बेहरा यांनी रस्ता बनवण्याचे काम स्वत:च सुरू केले, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेOdishaओदिशा