शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

प्रेमासाठी काय पण! 70 वर्षांचा नवरा अन् 25 वर्षीय नवरी; जगाची पर्वा न करता केलं लग्न, म्हणतात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 14:40 IST

एका शोमध्ये पती-पत्नीने आपल्या नात्याविषयी माहिती दिली आहे. स्टेफनी आणि डॉन अशी या दोघांची नावं आहेत. स्टेफनीचं वय 25 आहे तर डॉन यांचं वय 70 वर्ष आहे.

प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से हे सतत समोर येत असतात. काही लोक प्रेमासाठी वाटेल ते करतात. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. 25 वर्षीय नवरी आणि 70 वर्षीय नवऱ्याने लग्न केल आहे. पण जगाची पर्वा न करता, लोक काय म्हणतील याचा विचार न करता हे दोघंही अत्यंत आनंदाने आयुष्य जगत आहेत. वयामध्ये खूप मोठं अंतर असलं तरी त्याचा नात्यावर अजिबात परिणाम होत नसल्याचं देखील या कपलने म्हटलं आहे. कॅनडामध्ये ही अजब घटना घडली आहे. 

एका शोमध्ये पती-पत्नीने आपल्या नात्याविषयी माहिती दिली आहे. स्टेफनी आणि डॉन अशी या दोघांची नावं आहेत. स्टेफनीचं वय 25 आहे तर डॉन यांचं वय 70 वर्ष आहे. त्यांच्या वयात तब्बल 45 वर्षांचं अंतर आहे. पण हे वय आपल्या नात्याच्या आड कधीही येत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. लोकांना काय वाटतं, याची पर्वा करत नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. एका शोमध्ये त्यांनी स्वतःबद्दलची ही माहिती दिली आहे. पत्नी स्टेफनी हिने Love Don’t Judge या शोमध्ये सांगितलं, की पाच वर्षांपूर्वी ती डॉन यांना एका पबमध्ये भेटली. 

पबमध्ये ती काम करत होती. डॉन जेव्हा या पबमध्ये यायचे, तेव्हा तिला खूप आनंद व्हायचा. त्यानंतर त्यांच्यातली जवळीक वाढली. मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. मात्र लग्नाबाबत आपल्या घरचे खूश नसल्याचं स्टेफनीनं सांगितलं. जेव्हा आई-वडील आणि भावाला त्यांच्या नात्याबद्दल कळालं, तेव्हा त्यांना स्टेफनीची काळजी वाटली. वयातल्या अंतरामुळे हे नातं फार काळ टिकू शकणार नाही, अशी भीती घरच्यांना होती. मात्र स्टेफनी आणि डॉन यांनी कोणाच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष करत लग्न केलं. 

कपलला दोन वर्षांचा मुलगाही आहे. त्याचं नाव लाचलान असं आहे. डॉन सांगतात, की अनेकदा लोकांना ते लाचलानचे आजोबा आहेत असं वाटतं पण अशा लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच लोकांना खरं काय ते सांगण्याचा देखील प्रयत्न करत नाही. डॉन यांच्या जीवनविम्याच्या पैशांसाठी आपण त्यांच्यासोबत राहत असल्याचं अनेकांना वाटतं, असं स्टेफनीचं म्हणणं आहे; मात्र हे दोघंही जगाची पर्वा न करता आनंदाने जगत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.